Corona Virus Sakal
पुणे

कुटुंबीयांनी एकमेकांना आधार देत मनातील भीती लावली पळून

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनाची लागण घरातील सर्व सदस्यांना झाल्याचे समजताच पाठक कुटुंबीय (नावे बदलण्यात आली आहेत.) घाबरून गेले. घरातून बाहेर पडणे शक्य नाही. अशा वेळी काही लागल्यास कोण मदत करेल? कोरोनाची भीती आज प्रत्येकाच्या मनात आहे. त्यात संपूर्ण कुटुंब बाधित असल्यामुळे कोणाच्या जिवाला धोका झाला तर? असे अनेक प्रश्‍नांनी पाठक कुटुंब चिंतेत होते. मात्र समुपदेशनामुळे या कठीण प्रसंगात एकमेकांचा आधार होत पाठक कुटुंबीयाने कोरोनावर मात केली आहे.

गोपाळराव पाठक यांचे वय ७५ वर्ष आहे. त्यांची पत्नी सुधा या ७० वर्षांच्या, तर त्यांच्या कुटुंबात दोन सुना, मुलगा आणि दोन नातवंडे आहेत. पाठक यांच्या दोन्ही सुनांमध्ये सर्वप्रथम लक्षणे दिसून आली. किरकोळ सर्दी व ताप आहे म्हणून दोघींनी घरगुती औषधेच घेतली. मात्र चौथ्या दिवशी दोघींमध्ये ही लक्षणे गंभीर होताना दिसली. कोरोना चाचणी करताच दोघीही पॉझिटिव्ह निघाल्या व त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करावे लागले. पुढील तीन ते चार दिवसात सर्वांमध्येच लक्षणे दिसू लागली व सगळेच बाधित झाल्याचे चाचणीच्या अहवालातून समजले. त्यामुळे सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली. त्यामुळे या दोघींच्या मनातील भीतीवर काम करणे महत्त्वाचे होते. समुपदेशनाच्या माध्यमातून दोघींच्या मनातील भीती कमी करण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांनादेखील भीती कमी करण्याकरिता अनेक कौशल्ये शिकविण्यात आली व हे कुटुंब आता कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहे.

हे करणे आवश्‍यक

  • आपली भीती खरी आहे का? काल्पनिक हे समजणे

  • भीतीबद्दल मित्र- मैत्रीण किंवा कुटुंबीयांशी बोला

  • स्वतःचा दिनक्रम (जेवणाच्या वेळा, झोप, व्यायाम, करमणूक, छंद ) व्यवस्थित पाळा

  • हृदयाचे ठोके वाढले असल्यास दीर्घ श्वास घेत शांत राहण्याचा प्रयत्न करा.

मनात खूप भीती निर्माण झाल्यास जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे आपल्या मनातील भीती समजून घेणे, ती कमी करण्यासाठी त्यावर काम करणे गरजेचे असते. आपल्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल भीती असल्यास, ताण निर्माण करणारे काही संप्रेरक निर्माण होतात. तसेच आपल्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते, प्रचंड घाम येतो व अनेकदा आपल्या रक्ताचा प्रवाह हृदयाकडे न जाता विरुद्ध दिशेने जाऊन मृत्यूचा धोका वाढतो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये संयम आणि भीती दूर करणे हाच एक पर्याय असतो. त्यासाठी समुपदेशन केले जाते.

- स्मिता कुलकर्णी, ज्येष्ठ समुपदेशक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT