Corona-Virus 
पुणे

औंधमध्ये मुलगा व वडिल दोघेही...

सकाळवृत्तसेवा

औंध - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये वडिल व मुलगा असे कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. एका पासष्ट वर्षीय व्यक्तीला तपासणीअंती कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्या घरच्यांची करण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या चाळीस वर्षीय मुलालाही कोरोनाची लागण झाल्याचे परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश डमाळे यांनी सांगितले. संबंधित पासष्ट वर्षीय व्यक्तीवर औंध जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून मुलाला बालेवाडी येथील निकामार उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. एकाच घरातील दोन रुग्ण आढळून आल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.

लहान व जवळ जवळ असणाऱ्या घरांमुळे रोजच एकमेकांशी संपर्क येत असल्याने सर्वच ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी केली जाणार आहे. सध्या डॉ. आंबेडकर वसाहतीत सर्वच नागरीकांची पल्स आॅक्सीमीटरद्वारे तपासणी करुन सर्व्हे केला जात आहे. तसेच पन्नास वर्षाच्या पुढील व्यक्तींची तपासणी करुन खबरदारीचा उपाय म्हणून स्वॅब  तपासणी केली जात आहे.

आजपर्यंत एकशे दहा जणांची तपासणी करण्यात आली असून पुढेही तपासणी व सर्व्हेचे  काम सुरु राहिल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. मार्च महिन्यातील लाॅकडाऊन सुरु झाल्यानंतर दाट लोकवस्तीची ही वसाहत असतांनाही कोरोनाला रोखण्यात यश आले होते. परंतु आता येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने येथील रहिवासी व प्रशासकीय यंत्रणेला खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT