corona  
पुणे

बारामतीतील सहा जणांचा कोरोना तपासणी अहवाल...  

विजय मोरे

उंडवडी (पुणे) : बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे काल एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या कुटूंबातील सहा जणांची आज कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. या सर्वांची कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे गोजुबावीकरांना दिलासा मिळाला आहे. 

गोजुबावी येथे कोरोनाग्रस्त सापडलेली व्यक्ती दौंड येथे व्यावसायिक आहे. ती शनिवारी (ता. 20) आई- वडीलांना भेटण्यासाठी गोजुबावीला आली होती. रविवारी त्या व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला, घशात खवखव असा त्रास होत होता. त्यामुळे ती व्यक्ती रविवारी घरीच आराम केल्यानंतर सोमवारी (ता. 22) सकाळी रूई येथील कोविड केअर सेंटरला उपचारांसाठी दाखल करण्यात आली होती. त्यांच्या घशातील स्वॅबचा नमुना घेण्यात आला होता. त्यांचा अहवाल काल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज सकाळी आरोग्य विभागाच्या वतीने संबंधित व्यक्तीच्या कुटूंबातील भाऊ, त्याची बायको, तीन मुली आणि आई, असे सहा लोकांचे घशातील स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. ते सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सहा लोकांना होम क्वारंनटाईन करण्यात आले असून, या गावात आरोग्य विभागाची दहा पथके तपासणीसाठी दाखल झाली आहेत. 

गोजुबावी गावातील 503 कुटूंबांची तपासणी करण्यात येणार आहे. गाव प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आले असून 14 दिवस लोकांना घरात बसावे लागणार आहे. तसेच, गावाचा पाच किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लोकांनी काळजी घेणे गरजेचे असून खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी पुणे, मुंबई व इतर ठिकाणाहून बारामतीत आलेल्या लोकांमध्ये कोणी आजारी असेल तर थेठ घरी न जाता रूई येथील कोविड केअर सेंटरला तपासणी केल्यानंतरच घरी जायला हवे. ही काळजी नातेवाईक व संबंधित व्यक्तीने घेतल्यास पुढील धोका टळू शकतो, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढे इफेक्ट? FDA ने चारपट वाढवली अन्न तपासणी, धक्कादायक आकडे समोर

Sahyadri Express: खिडकीतून हात घालून पर्स लंपास; प्लॅटफॉर्मवर महिलेचे दागिने हिसकावले, सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा थरार

Latest Marathi Live Update: पुण्यात वाघोली परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT