Corona-Killer-Machine 
पुणे

विषाणूपासून संरक्षण करणारे ‘कोरोना किलर’ उपकरण

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘आयनायझेशन’च्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या आवरणास नष्ट करून व्यक्तीचे कोरोना विषाणूपासून रक्षण करणाऱ्या ‘कोरोना किलर’ उपकरणाची निर्मिती करण्यास पुण्यातील उद्योजकाला यश प्राप्त झाले आहे. या इलेक्‍ट्रॉनिक उपकरणास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) तर्फे कार्यक्षमता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील शिवणे येथील ‘इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्यूशन्स प्रा. लि.’ या कंपनीने संशोधन केलेले आणि अशा स्वरूपाची मान्यता मिळवणारे हे पहिले उपकरण ठरले आहे. कंपनीचे अध्यक्ष भाऊसाहेब जंजिरे यांनी याबाबत माहिती दिली.

जंजिरे म्हणाले, ‘कोरोना किलर हे फक्त विजेवर चालणारे आणि साबण किंवा सॅनिटायझर न लागणारे इलेक्‍ट्रॉनिक उपकरण आहे. हे उपकरण कोणत्याही बंद परिसरात वापरता येते. तसेच पुण्यातील नायडू रुग्णालयात या उपकरणाचे क्‍लिनिकल ट्रायल करण्यात आले. यामध्ये रुग्णालयातील सुमारे ३० पॉझिटिव्ह रुग्णांचा स्वॅब या उपकरणाच्या समोर ठेवण्यात आला. तसेच स्वॅबमधील कोरोना विषाणू नष्ट होत आहेत का याची चाचणी करण्यात आली. या यशस्वी वापरानंतर रुग्णालयामार्फत उपकरणाला प्रमाणपत्र देण्यात आले. कोरोना रुग्णाचे मास्क, हातमोजे, बेडशीट आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास देखील हे उपकरण उपयोगी ठरते.’

या उपकरणाचे उत्पादन सुरु असून दररोज २०० उपकरणे निर्मिती केली जाते. ही क्षमता वाढविण्यात येणार असून याचा पुरवठा देशात आणि देशाबाहेरही केला जाणार असल्याचे जंजिरे यांनी सांगितले.

कोरोना किलरचे वैशिष्ट्य -

  • घर, रुग्णालय, शाळा, गाड्या, विमान, प्रयोगशाळा, विलगीकरण कक्ष, कारखाने, मंदिरे अशा ठिकाण वापरता येते.
  • पर्यावरणातील हवेला विघटित करून ‘आयन’ (वायू यांचा विद्युतभारित कण) बाहेर सोडून कोरोना विषाणूच्या बाह्य कवचला तोडण्यास सक्षम
  • विषाणूवर सॅनिटायझर आणि साबणाप्रमाणेच कार्य करते

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉन्सूनची चाल मंदच, राज्यात 'या' तारखेपासून पावसाचा जोर वाढणार; कृषी विभागाचं शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन

Abhijit Dipke: आम्हाला फेक म्हणण्यापेक्षा म्हणणं समजून घ्या, देशात आंदोलनकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न : अभिजित दिपके

Petrol Excise Duty: पेट्रोल स्वस्त होणार? सरकारकडून उच्च इथेनॉल पेट्रोलवरील कर माफ; पण E30 मुळे वाहनधारकांची चिंता वाढणार?

Vaibhav Sooryavanshi: मुलासाठी विकली वडिलोपार्जित जमीन; आता वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी जे सांगितलं, ते ऐकून तुम्हीही भावुक व्हाल...

Smart Prepaid Meter : लाईटबिल भरण्याची कटकट संपवा! ५०० रुपयांच्या रिचार्जवर किती दिवस चालतो स्मार्ट प्रीपेड मीटर? पैसे वाचवणार

SCROLL FOR NEXT