Corona is making changes in teaching methods Research policies also need to change 
पुणे

कोरोना करतोय शिक्षण पद्धतीत बदल; रिसर्चच्या धोरणातही बदलांची गरज

सम्राट कदम

पुणे : शिक्षणाचे काम विद्यापीठांकडे तर संशोधनाचे काम राष्ट्रीय संशोधन संस्थांकडे, असे अलिखित धोरण आपल्या देशात आहे. आता हे धोरण बदलण्याची वेळ आली असून, विद्यापीठांसह खासगी संस्थांमध्येही संशोधनासाठी विशेष लक्ष देण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

संशोधनाची प्राथमिकता, संसाधने, मनुष्यबळ विकास, विविध संस्थांची भूमिका, संशोधकांची आर्थिक उन्नती आणि संशोधनाचा दर्जा यांचा समग्र विचार असलेल्या धोरणाची देशाला आवश्‍यकता आहे. नवीन शैक्षणिक धोरणात यासंबंधी अंतर्भाव असल्याचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी सांगितले आहे. पण यासंबंधीची प्रगती संथ गतीने असल्याचेही ते म्हणाले. 

बदलाची गरज का? 
- राष्ट्राची उन्नती थेट संशोधनाशी निगडित 
- पायाभूत सुविधांसह दर्जात्मक शिक्षणाचा अभाव 
- प्रक्रियांनाही पेटंट मिळत असल्यामुळे उद्योगांच्या आत्मनिर्भरतेसाठी संशोधन आवश्‍यक 
- शैक्षणिक संशोधन आणि उच्च शिक्षणातून संशोधनाकडे जाण्याचा कल कमी 
- देशातील संशोधकांची संख्या, संसाधन आणि संशोधनाचा दर्जा सुमार 
- पीएचडीनंतरही योग्य संधीचा अभाव 
- शिक्षक भरतीचा प्रश्‍न गंभीर 


कोणते बदल अपेक्षित :  
- विद्यापीठांसह खासगी संस्थांमध्ये संशोधनपुरक तरतुदी आवश्‍यक 
- "प्रोसेस टू प्रॉडक्‍ट' आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा अंतर्भाव 
- आंतरविद्याशाखीय शिक्षण, संशोधन आणि नोकरीसाठी परिपूर्ण धोरण 
- मूलभूत संशोधन आणि उद्योगस्नेही संशोधनावर भर 
- शिक्षक आणि विद्यार्थी कौशल्यविकासासह गुणवत्ता सुधार 
- शिक्षक भरतीचा प्रश्‍न सोडविणे 

 
कात्रज टेकडीफोड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 'असा' दिला निकाल;प्रशासनाने म्हणणेच मांडले नाही

- एक हजार कामगारांमागे संशोधक (टक्‍क्‍यांमध्ये) 

वर्ष 2015 2018 
चीन 2 2.3 
भारत  0.6 0.7 

10 लाख नागरिकांमागे संशोधक (वर्ष 2019) 
देश : संशोधकांची संख्या 
अमेरिका : 4,205 
चीन : 1,098 
भारत : 156 

(स्रोत : युनेस्को इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक) 

- देशातील विज्ञान तंत्रज्ञानाबद्दल आकडे बोलतात.... 
डीएसटी, सिएसआयरच्या संशोधन विभाग : 57 
विज्ञान तंत्रज्ञान विद्यापीठे : 162 
पदवी घेणाऱ्या विद्यार्थी संख्येत भारताचा जगात : 8 क्रमांकावर 
वर्षाला पीएचडी करणारे : 4 हजार 
वर्षाला पदव्युत्तर शिक्षण घेणारे : 35 हजार 

 

''उपयोजित विज्ञानाबरोबरच मूलभूत विज्ञानातील संशोधनासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग वाढायला हवा. कोरोनामुळे संशोधनाला बूस्टर मिळाला असला, तरी दीर्घकालीन प्रभावी धोरणाची गरज देशाला आहे.''
- डॉ. अरविंद नातू, अध्यक्ष, संचालक मंडळ, आयसर कोलकता 

 

(Edited by: Sharayu Kakade) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Trade Ban : तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT