corona 
पुणे

अरे रे, काश्मीरवरून सुटीला आलेल्या जवानाला कोरोनाने घेरले...

हितेंद्र गद्रे

यवत (पुणे) : दौंड तालुक्यातील यवत गावात आज कोरोनाने प्रवेश केल्याचे समोर आले आहे. संसर्ग झालेली व्यक्ती केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान आहे.

संबंधित जवान जम्मू- काश्मीर येथून चार दिवसांपूर्वी (ता. 30) सुटीसाठी यवत या आपल्या गावी आले आहे. त्यांनी स्वतः आपली तपासणी करून घेतली होती. या तपासणीचा अहवाल आज आला. त्यात त्यांनी कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक राजगे यांनी दिली. 

यवत गाव आजवर कोरोनापासून दूर होते. हे मोठी बाजार पेठ असलेले गाव आहे. तालुक्यातील केडगाव, वरवंड, पाटस या मोठ्या बाजारपेठेच्या गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर यवत आजवर कोरोनापासून दूर राहिले होते. मात्र, आज यवतमध्येही या संसर्गाची सुरुवात झाल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. 

केडगाव येथील एक रुग्ण यवत येथील एका खाजगी रूग्णालयात मागील चार दिवसांपासून उपचार घेत होता. या रुग्णाचा अहवाल सकारात्मक आल्याने कालपासूनच यवतमध्ये चिंतेचे वातावरण होते. आज यवत येथील नागरिक असलेल्या केंद्रिय राखीव पोलिस दलातील जवानाचा अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे या चिंतेत अधिकच भर पडली आहे. या जवानाच्या संपर्कात नेमके किती लोक आले, याची तपासणी पोलिस, आरोग्य विभाग व आपत्ती व्यवस्थापन समितीकडून सुरू करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, केडगाव येथील रूग्ण यवत येथील ज्या रूग्णालयात उपचार घेत होता, ते रूग्णालय व परिसर प्रतिबंधीत करण्यात आला असल्याची माहीती यवतचे ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे यांनी दिली.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT