coronavirus-test positive
coronavirus-test positive 
पुणे

वेल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढता वाढता वाढे...

मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्‍यातील वडगाव झांजे परिसरात आज आणखी चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. येथील 16 जणांना काल (ता. 15) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 
12 जणांचे अहवाल निगेटिव्ह; तर चार जण बाधित असल्याचे अहवाल आजा आले. त्यामुळे वडगाव झांजे परिसरात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 14 वर पोचली आहे. तसेच, या परिसरातील पहिला रुग्ण बरा झाल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली. 

वडगाव झांजे परिसरात 9 मे रोजी एका 38 वर्षीय युवकास कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर 14 मेपर्यंत एकूण 10 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर 15 मे रोजी 19 जणांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला होता. परंतु, आज पुन्हा एकदा 4 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वेल्हे तालुक्‍यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 23 झाली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे; तर 9 जणांनी कोरोनावर मात केली आहे; तर उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

वेल्हे तालुक्‍यात शहरातून येणाऱ्या नागरिकांसाठी होम क्वांरटाइनसाठी तालुक्‍यात समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यात चार मंडलमध्ये पर्यवेक्षक म्हणून अधिका-यांची नेमणूक केली असून, वेल्हे मंडलात पर्यवेक्षक म्हणून तहसीलदार शिवाजी शिंदे, अंबवणे मंडलात तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर, पानशेत मंडलात गटविकास अधिकारी विशाल शिंदे, विंझर मंडलात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता अश्‍विनी घोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

वडगाव झांजे परिसरातील गावांमध्ये सॅनिटायझर, मेडिक्‍लोरियम, हॅंडवाशचे घरोघरी वाटप करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी तुषार काशीद यांनी दिली, तर दिवसांतून दोर वेळा सोडिअम क्‍लोराईडची फवारणी चालू असल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या परिसरातील वडगाव झांजे केंद्रस्थानी मानून तीन किलोमीटर परिसरामधील सुरवड, सोंडे माथना, सोंडे कार्ला, कोदवडी, सोंडे सरपाले, आसनी दामगुडा, मंजाई आसनी ही गावे बफर क्षेत्र म्हणून घोषित केलेली आहेत. या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून पोलिस चोवीस तास खडा पहारा देत असल्याची माहिती वेल्ह्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांनी दिली. परिसरातील गावांमध्ये कोणाला काही लक्षणे आढळल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क करून तपासण्या करण्यासाठी स्वतःहून पुढे येण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी सुदर्शन मालाजुरे यांनी केले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

SCROLL FOR NEXT