Corona Patients Sakal
पुणे

पुणे शहरात कोरोना रुग्णांत ३० दिवसांत दहा पटीने वाढ

पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांत गेल्या ३० दिवसांत दहा पटीने वाढ झाली आहे. बुधवारी(ता.५) शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ७ हजार ३२० इतकी झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांत गेल्या ३० दिवसांत दहा पटीने वाढ झाली आहे. बुधवारी(ता.५) शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ७ हजार ३२० इतकी झाली आहे.

पुणे - पुणे शहरातील (Pune City) नवीन कोरोना रुग्णांत (Corona Patients) गेल्या ३० दिवसांत दहा पटीने वाढ (Increase) झाली आहे. बुधवारी (ता. ५) शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ७ हजार ३२० इतकी झाली आहे. हीच संख्या महिनाभरापूर्वी ७४२ इतकी होती. दिवसातील नवीन कोरोना रुग्णांतही ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने शहर व जिल्ह्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांचा अहवाल रोज रात्री प्रसिद्ध केला जातो. या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे.

सध्या शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, दिवसातील नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या कमी होऊ लागली आहे. रुग्ण संख्या वाढत असली तरी पुणेकरांनी घाबरून जाऊ नये. आवश्‍यक खबरदारी घ्यावी. यासाठी मास्कचा नियमित वापर करणे, वारंवार हात धुणे, गर्दीत जाणे टाळावे आणि लक्षणे दिसताच जवळच्या दवाखान्यात त्वरित जावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

महिनाभरापूर्वी म्हणजेच ६ डिसेंबरला पुणे शहरात एका दिवसात केवळ ३८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. हीच बुधवारी दिवसातील रुग्ण संख्या १ हजार ८०५ वर गेली आहे. यामुळे महिनाभरातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांचा फरक १ हजार ७६७ इतका झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या महिनाभरात १२ हजार ८१० इतकी झाली आहे.

शहरातील महिनाभरातील कोरोना स्थिती

  • तीस दिवसांपूर्वी दिवसातील नवे रुग्ण, ३८

  • तीस दिवसानंतर दिवसातील नवे रुग्ण, १ हजार ८०५

  • महिन्यापूर्वीचे एकूण कोरोनाबाधित ५ लाख ७ हजार १७४

  • महिनाभरानंतर बुधवारपर्यंतचे कोरोनाबाधित ५ लाख १४ हजार ४९४

  • महिन्यात वाढलेले कोरोना रुग्ण ७ हजार ३२०

  • गेल्या ३० दिवसातील कोरोना चाचण्यांची संख्या १ लाख ८८ हजार ८३८

  • आतापर्यंत झालेल्या एकूण कोरोना चाचण्या ३९ लाख सहा हजार ३२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT