Pune Municipal Sakal
पुणे

पुण्यात निर्बंध कायम, दिलासा नाहीच; महापालिकेचे नवे आदेश

सकाळ वृत्तसेवा

तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात तिसऱ्या स्तरातील नियम लागू केल्याने पुण्यात निर्बंध वाढले आहेत.

पुणे - दुकानांच्या वेळा वाढवा अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात असली तरी महापालिकेने त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. शहरात यापुढेही आत्तापर्यंतचे नियम लागू राहणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यासंदर्भात आज (शनिवारी) आदेश काढले आहेत. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित असून, गेल्या महिन्याभरापासून बाधितांचा दर देखील पाच पेक्षा कमी आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नियमानुसार पुण्याचा स्तर दोन मध्ये समावेश होतो. मात्र, तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने राज्यभरात तिसऱ्या स्तरातील नियम लागू केल्याने पुण्यात निर्बंध वाढले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून व्यापाऱ्यांकडून, मॉल चालकांकडून पुण्यातील निर्बंध शिथिल करा अशी मागणी केली जात होती. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले होते.

सध्याच्या निर्बंधानुसार दुकाने दुपारी चार पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानांना शनिवारी व रविवारी बंद ठेवावी लागत आहेत. यामध्ये शिथीलता देऊन दुकाने उघडे ठेवण्याची वेळ किमान सायंकाळी आठ पर्यंत केली जावी अशी मागणी केली जात होती. या आदेशांची मुदत आज (३१ जुलै) संपत होती. त्यामुळे महापालिका आयुक्त कुमार यांनी आज नव्याने निर्बंधांचे आदेश काढले असले तरी यात पूर्वीचे नियम कायम ठेवले आहेत. तसेच शहरातील शाळा, महाविद्यालये यासह सर्व शैक्षणिक संस्था बंद असतील. आॅनलाइन शिक्षण सुरू असेल, असेही आदेशात नमूद केले आहे. हे आदेश पुणे कॅन्टोन्‍मेंट व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला देखील लागू आहेत.

‘‘दुकानांची वेळ सायंकाळी आठ पर्यंत असावी आणि शनिवार-रविवारी देखील दुकाने सुरू असावेत अशी आमची मागणी आहे. यासाठी वारंवार पाठपुरावा देखील सुरू आहे. उपनगरे व ग्रामीण भागात नियमांची कडक अंमलबजावणी नाही, पण शहराच्या मध्यवर्ती भागात कडक नियम आहेत. याचा परिणाम व्यवसायावर होत असून, आमचे ग्राहक तुटत आहेत. त्यामुळे दुकानांची वेळ वाढविणे आवश्‍यक आहे. महापालिका त्याबाबत निर्णय घेत नसल्याने आमचे मोठे नुकसान होत आहे.’’ -राहुल बोरा, अध्यक्ष, लक्ष्मी रस्ता व्यापारी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT