Corona-Recovery 
पुणे

पुणे विभागातून आली दिलासादायक बातमी; कोरोनामुक्तांचा टक्का वाढला!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यासह पाच जिल्ह्यांमध्ये 43 हजार 223 कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. कोरोना बाधित चार हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. तर, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 70.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे विभागात कोरोना बाधितांची संख्या एक लाख 58 हजार 781 इतकी झाली आहे. त्यापैकी एक लाख 11 हजार 449 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित एक लाख 19 हजार 965 रुग्णांपैकी 91 हजार 389 रुग्ण बरे झाले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 821 आहे. कोरोनाबाधित दोन हजार 755 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के तर, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 76.18 टक्के आहे. 

सातारा जिल्हा : 
कोरोना बाधित रुग्ण : 6 हजार 836 
बरे झालेले रुग्ण : 3 हजार 397
ॲक्टीव रुग्ण संख्या : 3 हजार 225 
मृत्यू : 214 

सोलापूर जिल्हा : 
कोरोना बाधित रुग्ण : 12 हजार 749  
बरे झालेले रुग्ण : 8 हजार 494
ॲक्टीव रुग्ण संख्या : 3 हजार 671 
मृत्यू : 584

सांगली जिल्हा : 
कोरोना बाधित रुग्ण : 5 हजार 650  
बरे झालेले रुग्ण : 2 हजार 499
ॲक्टीव रुग्ण संख्या : 2 हजार 960 
मृत्यू : 191

कोल्हापूर जिल्हा : 
कोरोना बाधित रुग्ण : 13 हजार 581  
बरे झालेले रुग्ण : 5 हजार 670 
ॲक्टीव रुग्ण संख्या : 7 हजार 546
मृत्यू : 365

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

Forest Plantation: पुणे वनवृत्तात ४०८ हेक्टरवर ३० लाख रोपे; वनमहोत्सव २०२६ साठी वन विभाग सज्ज

Fake Cosmetics Sale : पुण्यात बनावट सौंदर्य प्रसाधनाची विक्री; औषध विक्रेत्यासह वितरकावर गुन्हा

SCROLL FOR NEXT