corona1 
पुणे

कोरोना योद्ध्यांनो जरा जपून, दौंडमध्ये रूग्णवाहिका चालकालाही बाधा

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांना कोरोना विषाणूची बाधा होण्याचे सत्र सुरू असून एका रूग्णवाहिका चालकाला बाधा झाली आहे. तालुक्यात एकूण १६ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. बाधितांमध्ये ३ वर्षाच्या चिमुकल्यासह ७० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश आहे. 

सावधान, वापरलेले मास्क रस्त्यावर टाकताय
                 
दौंड शहरात २२ जुलै रोजी उप जिल्हा रूग्णालयातील एका महिला कर्मचार्यास बाधा झाली आहे. २४ जुलै रोजी नगरपालिका हद्दीत आढळलेले बाधित रूग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे विलगीकरण करण्यासाठी नियुक्त पथकातील नगरपालिका आरोग्य कर्मचारीस बाधा झाली आहे. तर, २५ जुलै रोजी एका ४० वर्षीय रूग्णवाहिका चालकास बाधा झाली आहे. 

दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून ४४ जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी (स्वॅब टेस्ट) पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी २५ जुलै रोजी आलेल्या अहवालानुसार शहरातील कुंभार गल्ली, जनता कॅालनी, दौंड- गोपाळवाडी रस्ता, शिवराज नगर, बंगला साइड, जनता विद्यालय परिसर, आदी भागातील एकूण ११ जणांना बाधा झाली आहे. बाधितांमध्ये ९ पुरूष व २ महिलांचा समावेश आहे. बाधितांचे वय ३ ते ७० दरम्यान असल्याची माहिती उप जिल्हा रूग्णालय अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. 

पुणे झेडपीच्या सभापतींना कोरोनाची लागण
                
दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागातील ५७ जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी (स्वॅब टेस्ट) पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी २५ जुलै रोजी आलेल्या अहवालानुसार तालुक्यातील बोरीपार्धी, खुटबाव, ताम्हणावाडी, उंडवडी व कासुर्डी येथील प्रत्येकी एक, असे एकूण ५ जणांना बधा झाली आहे. बाधितांमध्ये ३ पुरूष व २ महिलांचा समावेश आहे. बाधितांचे वय २५ ते ५५ दरम्यान असल्याची माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॅा. अशोक रासगे यांनी दिली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde: ‘नाव घेतल्याने कोणी आरोपी ठरत नाही : मीनाक्षी शिंदे; ‘तपास होऊ द्या, सत्य बाहेर येईल’ शिंदेंचा पलटवार

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

ST NCMC Card: तिकिटाचे पैसे कटल्यानंतर पुन्हा ६० रुपये गायब;एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी फटका, ज्येष्ठाची तक्रार

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील गुंडगिरीला अमित शहा जबाबदार- संजय राऊत

Ravikiran Ingawale : 'शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपवलं...'; रविकिरण इंगवलेंच्या व्हायरल ऑडिओमुळे खळबळ, कोराणे कुटुंबाची सखोल चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT