marriage. 
पुणे

एका लग्नाची मोठी गोष्ट...वऱ्हाडींसह नवरा- नवरीचंही जुळलं कोरोनाशी नातं 

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे)  : जुन्नर तालुक्यातील नुकत्याच लग्न झालेल्या नवरा- नवरीला कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शारीरिक अंतर पाळत संस्थात्मक क्वारंटाइन होण्याची पाळी आली आहे.

जुन्नर तालुक्यातील धालेवाडी येथील एका विवाह सोहळ्यातील नवरा-नवरी कोरोनाबाधित असल्याचे काल रात्री उशिरा आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 
येथील लग्नसोहळ्यासाठी आलेला पाव्हणा, कार्यमालक, वऱ्हाडी आणि पाठोपाठ नवरा-नवरी कोरोनाबाधित निघाल्याने हा विवाह सोहळा चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे.  संपर्कातील अनेकांनी स्वतःहून आपली स्वॅब टेस्ट करून घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोहळ्यात सहभागी झालेल्याच्या संपर्कातील रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. प्रशासनाने देखील याची गंभीर दखल घेत जुन्नर तालुक्यातील लग्नसोहळ्यासाठी २० लोकांची मर्यादा घातली आहे. यामुळे जिल्ह्यातील लग्नसोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी असताना जुन्नरला मात्र वीस जणांमध्ये विवाह सोहळा उरकावा लागत आहे.  

जुन्नर तालुक्यात कोरोनाचे १३७ रुग्ण झाले असून, सर्वाधिक १४ रुग्ण हे धालेवाडी येथील आहेत. काल धालेवाडी, शिरोली बुद्रुक, हिवरे बुद्रुक, धनगरवाडी, जुन्नर, ओतूर, पिंपळगाव- आर्वी, तेजेवाडी, वारुळवाडी, चौदा नंबर येथे एकूण १९ संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण १३७ पैकी ६९ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर औरंगपूर, मोकासबाग व पिंपळगाव-आर्वी येथील प्रत्येकी एक, अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

जुन्नर येथील संशयित कोरोनाबाधित रुग्ण लेण्याद्री येथील कोविड केंद्रातून ससूनला जात असल्याचे सांगून निघाला, मात्र ससूनला न जाता तो आपल्या मूळ गावी जाऊन बसला. याचा अहवाल  देखील पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने पोलिस व नगर पालिका प्रशासनाने नियमांची अमलबजावणी कठोरपणे सुरू केली आहे.

Edited by : Nilesh Shende

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Heatwave Deaths : विदर्भात उष्णतेची भयंकर लाट ! नागपुरात उष्माघाताने एकाच दिवशी ३ जणांचा मृत्यू; IMD चा नागरिकांना इशारा

Aurangabad Accident: कामावरून घरी परतताना काळाचा घाला! लिंबेजळगावजवळ भीषण अपघातात दोन मजुरांचा दुर्दैवी अंत, महामार्गावर मृत्यूचा थरार..

Petrol-Diesel Rate: पेट्रोल-डिझेलच्या दरांत 4 दिवसांत दोनदा दरवाढ! काय आहे आजचे नवे दर?

Ratnagiri Blast: Ratnagiri सरपण गोळा करताना अनोळखी वस्तू दिसली, कुतुहलाने उचलताच झाला स्फोट; महिलेच्या हाताची बोटे तुटली

Walmik Karad: आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली; 'युरोसिस्टायटीस' नावाचा गंभीर आजार! तीन दिवसांपासून सलाईनवर, कारागृहातच...

SCROLL FOR NEXT