corona1 
पुणे

पोटदुखीने त्रस्त झालेल्या भावाचा देखभालीसाठी गेला अन् कोरोना घेऊन आला  

दत्ता जाधव

माळशिरस (पुणे) : पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील एका तरुणाला मागील आठवड्यात पोट दुखत असल्याने दौंड तालुक्यातील केडगाव येथील रुग्णालयात ऍडमिट केले होते. त्याच्या देखभालीसाठी तेथे राहिलेल्या त्याच्या भावास  कोरोनाची बाधा झाली.

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या माळशिरस येथे मागील दहा दिवसांपूर्वी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडली. त्यानंतर ती बरे होऊन रुग्णालयातून काल घरी पोहोचली. त्यामुळे माळशिरस गाव कोरोनामुक्त होते ना होते, तोच आज महाले वस्ती येथील एका तरुणाचा कोरणा अहवाल पॉझिटिव्ह आला. या तरुणाच्या भावाला दहा दिवसांपूर्वी पोटदुखी होत असल्याने केडगाव येथील एका रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट करण्यात आले होते. त्याच्या देखभालीसाठी हा तरुण त्या ठिकाणी रुग्णालयात पाच दिवस थांबला होता. त्यानंतर घरी आल्यानंतर या तरूणाला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

माळशिरस या कोरनामुक्त झालेल्या गावात परत एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने परत एकदा मोठी खबरदारी घेण्याची वेळ आलेली आहे. महाले वस्ती येथील भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कोरनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबियांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळे परत एकदा माळशिरस ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT