Ajit Pawar 
पुणे

पुण्यातील बैठक अजित पवार यांच्या अनुपस्थितीत; राजकीय वर्तुळात चर्चा

सागर आव्हाड

पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे ही पार पडतेय. आजच्या बैठकीला मात्र उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित राहणार नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेतली जाणार आहे. (Corona Review Meeting in Pune in the absence of Ajit Pawar)

आजच्या बैठकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना नियमात शिथिलता देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु, बैठकीला पालकमंत्री अजित पवार उपस्थित राहणार नसल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरु झालीय.

पुणे शहर व पिंपरी चिंचवडपाठोपाठ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधितांचा दर (कोरोना पॉझिटिव्हिटी रेट) हा सात टक्क्यांच्या आता आला आहे. यामुळे शहरापाठोपाठ ग्रामीण भागातील निर्बंधही हटविले जाण्याची शक्यता आहे. निर्बंध शिथिलतेबाबतचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे हे उद्या (ता.२५) होणाऱ्या जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीत जाहीर करतील, असे गुरुवारी (ता.२४) जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहर व पिंपरी चिंचवडमधील कोरोना बाधितांचा दर हा दोन आठवड्यांपूर्वीच पाच टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मागील दोन आठवड्यांपासून या दोन्ही शहरातील निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागातील हा दर दहा टक्क्यांहून अधिक होता. त्यामुळे येथील निर्बंध अद्याप कायम आहेत. ग्रामीणमधील बाधितांचा दर, आठवडाभरापूर्वी साडेनऊ टक्के, चार दिवसांपूर्वी साडेआठ टक्के झाला होता. तोच आज (ता.२४) सात टक्क्यांवर आला आहे.

कालच वाझे प्रकरणात अजित पवार यांची CBI चौकशीची मागणी करण्यात आलीय. तर दुसरीकडे पुण्यातील आंबील ओढा प्रकरणातील विकासक निकटवर्तीय असल्याचं बोललं जातंय. तर आज अनिल देशमुख यांच्या घरावर ed छापा पडलाय आता बैठकीनंतर मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT