school sakal
पुणे

परीक्षेपासून वंचित ठेवणाऱ्या शाळांवर गुन्ह्याच्या मागणीसाठी आंदोलन

कोरोनाच्या संकट काळात आर्थिक संकट ओढावल्याने अनेक पालकांना शाळेचे शुल्क भरणे शक्य झाले नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शाळेचे शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा यांपासून वंचित ठेवणाऱ्या शाळा आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी, पालक, शिक्षक महासंघातर्फे सोमवारपासून (ता.२१) शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या संकट काळात आर्थिक संकट ओढावल्याने अनेक पालकांना शाळेचे शुल्क भरणे शक्य झाले नाही. मात्र, शुल्क भरण्यासाठी पालकांनी सवलतीची मागणी केली असताना देखील शाळांकडून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवू नये, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. परंतु तरी खासगी शाळांकडून या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते.

विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परिक्षा यांपासून वंचित ठेवणाऱ्या, तसेच शिक्षण हक्क कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या शाळांवर आणि संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी हे आंदोलन करणार असल्याचे महासंघाच्या महिला पालक अध्यक्षा दिपाली सरदेशमुख यांनी सांगितले. तसेच खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठविण्यासाठी पालकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सरदेशमुख यांनी केले आहे.

‘‘शाळांमध्ये प्रवेश घेताना बऱ्याच शाळा देणगी शुल्क रक्कम पालकांकडून सक्तीने घेतात. त्यांच्यावर आणि संबंधित जबाबदार सर्वांवर शिक्षण विभागाने तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत.’’

- दिपाली सरदेशमुख, अध्यक्ष, महिला पालक, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी, पालक, शिक्षक महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे उद्यापासून २४ तास दर्शन, ६ किमीपर्यंत दर्शनरांग; आषाढीसाठी खास व्यवस्था

Petrol-Diesel Price: 15 जुलैचे नवे दर जाहीर! कच्चे तेल 15 डॉलरने महागल्यानंतर मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेल आता कितीला?

आजचे पंचांग १५ जुलै २०२६! चंद्रदर्शन, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि संपूर्ण दिनविशेष

Latest Marathi News Update : पनवेल-जेएनपीटी मार्गावर उड्डाणपुलाचा गर्डर कारवर कोसळला

Maharashtra Farmers: पेरलं, पण उगवलंच नाही! बोगस सोयाबीन बियाण्यांनी हजारो शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT