corona logo 
पुणे

धक्कादायक, दिल्लीवरून शिरूरला परतलेल्या विद्यार्थ्याला कोरोना  

दत्तात्रेय कदम

मांडवगण फराटा (पुणे) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 24 वर्षीय विद्यार्थ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. तो आठ दिवसांपूर्वी दिल्ली येथून आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली. मांडवगण फराटा हे या परिसरातील मोठी बाजारपेठ असलेले गाव असल्याने या भागात खळबळ उडाली असून, नागरिक भयभीत झाले आहेत.

मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील कोरोना संसर्ग झालेला विद्यार्थी दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची ( UPSC ) तयारी करण्यासाठी गेलेला होता. केंद्र सरकारने एका विशेष रेल्वेने महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना इकडे पाठवले होते. 

या विद्यार्थ्यांबरोबर तो आला होता. १९ मे रोजी घरी आल्यावर त्याला ताप, घशात खवखव व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. अशातच त्याच्या बरोबर आलेल्या कोल्हापूर येथील मित्राची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्या मित्राने फोनवरून ही माहिती दिली होती. त्यामुळे या विद्यार्थ्याला लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. या तरुणाला ताप व थोडा घसा दुखत असल्याने त्याला नोबेल रुग्णालयाला पाठविले होते. त्याची टेस्ट केल्यानंतर करोना संसर्गाची लक्षणे दिसून आली होती. त्या ठिकाणी तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला.

या तरुणाला पुढील उपचारासाठी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आले आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी त्या विद्यार्थ्याच्या संपर्कात आलेले नातेवाईक, मित्र यांना होम क्वारंटाइन केले असून, सर्वांच्या आरोग्याकडे आरोग्य अधिकारी लक्ष ठेऊन आहेत. येथे लॉकडाऊन असतानाही नागरिक गंभीर नव्हते. परंतु, आता मात्र सर्व नागरिक हादरले आहेत. महसूल विभागाने मांडवगणच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Weakening India : देशाच्या ७० ते ८० टक्के भागांत पावसाचे ढग दिसेनात; माॅन्सून कुठे गायब झाला ? हवामान विभागाची मोठी माहिती

Chhatrapati Sambhajinagar: पाच कोटी रोख, चार रायफल, दोन पिस्टल, सहा हजार काडतुसे! ; डाॅन बाबा फर्जनच्या घरात घबाड

Latest Marathi News Update : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालख्या पुण्यातून मार्गस्थ

Moshi Garbage Dump Accident : मेंदीचा रंग उतरण्याआधीच कुंकू पुसले; अक्षय सावंतच्या निधनाने पत्नीवर कोसळला दुःखाचा डोंगर, अवघ्या दोन महिन्यांत संसाराची राखरांगोळी

Iran US Conflict : पेट्रोल- डिझेलचे दर पुन्हा वाढणार? इराण-अमेरिका संघर्ष भडकला; होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची इराणची घोषणा

SCROLL FOR NEXT