पुणे

राज्यातील 60 जणांची कोरोना चाचणी "निगेटिव्ह' 

सकाळवृत्तसेवा

पुणे - चीनसह कोरोना विषाणूंचा उद्रेक झालेल्या 24 देशांमधून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या 38 हजार 131 प्रवाशांची तपासणी महिनाभरात करण्यात आली. त्यापैकी कोरोनाची लक्षणे आढळलेल्या राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमधील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या 64 पैकी 60 जणांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला नसल्याची माहिती पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (एनआयव्ही) राज्याच्या आरोग्य खात्याला देण्यात आली. 

चीनमध्ये कोरोना विषाणूंचा उद्रेक झाला आहे. याचा संसर्ग देशातील लोकांना होऊ नये, याची खबरदारी आरोग्य विभागातर्फे घेण्यात आली आहे. त्यासाठी कोरोना बाधित देशांमधून आलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी विमानतळावरच करण्यात येते. प्रवाशांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यास त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जाते. यातून आतापर्यंत 38 हजार रुग्णांची तपासणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केली. तसेच, बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 220 प्रवासी आले आहेत. 

रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या 64 प्रवाशांपैकी 59 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या दोन जण मुंबईत, तर तीन जण सांगलीमधील रुग्णालयात भरती आहेत. नवीन कारोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून, राज्यात सध्या 39 विलगीकरण कक्षांमध्ये 361 खाटा उपलब्ध आहेत. 

138 प्रवाशांचा 14 दिवस पाठपुरावा 
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वुहान शहरातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात भरती करण्याचे आणि त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राबविण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 220 प्रवाशांपैकी 138 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver : साताऱ्यातील 31,556 शेतकरी पात्र! अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; तुमच्या गावातील यादी 'येथे' पाहा

Mumbai Crime: लोक भवनाच्या नावाखाली रेल्वे तिकीट घोटाळा! खोटे शिक्के अन् राज्यपालांची बनावट सही, सूत्रधारासह ३ रेल्वे एजंट अटकेत

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! फिटमेंट फॅक्टरवर सरकारने पहिल्यांदाच मांडली अधिकृत भूमिका; संसदेत काय सांगितले?

Latest Marathi News Live Update : मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर जोरदार टीका

Prashant Kishor: "माझ्याच पोलीस ठाण्यात मला धमक्या, एकदा वर्दी काढली तर..."; SHO अन् प्रशांत किशोर यांच्यात वाद, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT