Corona test orders The plight of the workers in the housing society in Pune
Corona test orders The plight of the workers in the housing society in Pune 
पुणे

कोरोना टेस्टचा आदेश ठरतोय डोके दुःखी; पुण्यातील हाऊसिंग सोसायटीतील कामगारांची व्यथा 

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून ते कमी होण्याचे कोणतीही चिन्हे सध्या दिसून येत नाही. शहरात असंख्य हाऊसिंग सोसायटीमध्ये लाखो नागरिक राहत असून त्यातील बहुतांश नोकरी करत आहेत. तर घरकाम आणि सोसायटीची देखभालीसाठी विविध कामगारांची गरज असते. कोरोनाचे वाढते संकट पाहता कामगारांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आले. मात्र चाचणीबाबत संभ्रम असल्याचे व त्यामुळे निर्माण होणाऱ्या असुविधांची व्यथा कामगारांकडून सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने जारी केलेल्या आदेशानुसार हाऊसिंग सोसायटीमध्ये नियमित येणाऱ्या कामगारांना भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करणे किंवा 15 दिवसांची वैधता असलेले आरटीपीसीआर प्रमाणपत्र सोबत ठेवण्याचे अनिवार्य असल्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने घरेलू कामगार, कचरा वेचक, चालक, सुरक्षा रक्षक अशा असंघटित कामगारांचा समावेश आहे. या घटकाचे उत्पन्न पाहता 15 दिवसांनी आरटीपीसीआर करणे हे नक्कीच परवडणारे नाही. मात्र अँटिजिन टेस्ट ही परवडणारी आणि त्वरित निष्कर्ष मिळत असल्यामुळे चांगला पर्याय ठरू शकतो. असे पुणे जिल्हा घरकामगार संघटनेच्या अध्यक्ष किरण मोघे यांनी सांगितले.

हेही वाचा - पुण्यात रेमडेसिव्हिरसाठी 'कोन्ट्रोल रुम'; गरजूंना टोल फ्री क्रमांकावर संपर्काचं आवाहन

मायक्रोकंटेन्मेंट झोन सदनिकेच्या संख्येवर ठरवावे:
पाच कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास सोसायटी 'मायक्रो कंटेन्मेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात येते. पण हा निकष सोसायटीत किती सदनिका आहेत त्याचा विचार करून ठरवायला हवा. 20 तसेच 400 सदनिकांच्या सोसायट्यांना तोच निकष लावणे सयुक्तिक वाटत नाही. असे विविध सोसायटीतील नागरिकांनी सांगितले.

कामगारांची समस्या :

  • - पगाराची चणचण असल्यामुळे प्रत्येक 15 दिवसांनी कोरोना चाचणीचा खर्च न परवडणारा
  • - आरटीपीसीआरच्या तपासणीचा अहवालासाठी लागणारा वेळ
  • - त्यामुळे अहवाल येईपर्यंत कामाला जाण्यास अडचण
  • - पीएमटी चालू की बंद ही संभ्रम अवस्था
  • - वायूमर्यादामुळे लस घेण्यास अडचणी

"हाऊसिंग सोसायटीतील नियमित कामगारांना आरटीपीसीआर किंवा अँटिजिन या दोन्ही पैकी कोणतेही चाचणी आवश्यक आहे. अँटिजिन टेस्टची सवलत सुद्धा आता देण्यात आली आहे. 15 दिवसांची वैधता असलेल्या आरटीपीसीआरचा हा कालावधी तितकाच असेल. त्यात कोणतेही बदल नाही. "
- विक्रम कुमार, आयुक्त- पुणे महापालिका

"सध्या सोसायटीच्या देखभालीचे काम करतोय व माझी पत्नी सोसायटीतील काही घरांमध्ये काम करते. त्यामुळे दोघांनाही आदेशाप्रमाणे पुन्हा 15 दिवसांनी चाचणी करावी लागणार. घरभाडे, मुलांचा खर्च या सगळ्या गोष्टींसाठी सतत तडजोड करत असताना आणखीन एक भर. तसेच लसीकरणासाठी वय बसत नाही.
- दिनेश सिंह, कामगार

"बहुतांश घरेलू कामगार तीन ते चार घरांचे काम करतात. त्यामुळे नियमितपणे ये जा होत असल्याने आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही पुढील चाचणीपर्यंत त्यांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. दरम्यान सोसायटीत प्रवेश करताना या कामगारांचे शरीराचे तापमान, ऑक्सिजनची पातळी न चुकता पाहिली जाते."
- हर्षद अभ्यंकर, रहिवाशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT