corona 
पुणे

दौंड तालुक्‍यातील नऊ जणांचा कोरोनाचा अहवाल असा आहे... 

संतोष काळे

राहू (पुणे) : दौंड तालुक्‍यातील दहिटणे कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकाच्या संपर्कात आलेल्या नऊ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती दौंडचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली. त्यामुळे दौंडमधील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

दौंड तालुक्‍यात 29 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 22 जणांचे क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्या घशाचे द्रव औंध येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील नऊ जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला असून, उर्वरित 13 जणांचे अहवाल अजून प्राप्त व्हायचे आहेत. 

खबरदारीचा उपाय म्हणून दहिटणे परिसरातील गावे सील करण्यात आली आहेत. तालुक्‍यातील अनेक ठिकाणी नाके बनवून येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. दहिटणे व परिसरातील गावातील घराघरांत जाऊन नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संबंधित रुग्णाच्या संपर्कात आणखी कोणी आले आहे का? याचा देखील शोध घेण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने गती देण्यात आली आहे. 

एकंदरीत नऊ जणांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने दौंडकरांना दिलासा मिळाला असला, तरी उर्वरित 13 जणांचे वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

Mayor: इटालियन फ्लोअरिंग, कौलारू छत, विशेष रूम अन्...; BMC च्या महापौर बंगल्याचा कायापालट होणार, कोणते बदल आणि खर्च किती?

'अगं अगं सुनबाई..' नंतर केदार आणि सना शिंदे यांचा नवा सिनेमा ‘आई भाड्याने हवी?’

Pune Fraud News : पाणी व्यवसायाच्या नावाखाली बाप-लेकांकडून दोन कोटी ३४ लाखांची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा दाखल

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

SCROLL FOR NEXT