covid test 
पुणे

सावधान! पुणेकरांनो कोरोना वाढतोय बरं का, काळजी घ्या

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात बुधवारी (ता.17) दिवसभरात 857 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 428 जण आहेत. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरातील सर्वाधिक नवीन रुग्णांबरोबरच आज पिंपरी चिंचवडमध्ये 227, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 142, नगरपालिका कार्यक्षेत्रात 51 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 9 रुग्ण सापडले आहेत. दिवसभरातील एकूण मृत्यूमध्ये शहरातील चार आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन रुग्णांचा समावेश आहे. आज पिंपरी चिंचवड, नगरपालिका आणि कॅंटोनमेंट बोर्ड क्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

दरम्यान, दिवसभरात 392 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 262, पिंपरी चिंचवडमधील 34 , जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 76, नगरपालिका क्षेत्रातील 15 आणि कॅंटोन्मेंट क्षेत्रातील 5 जणांचा समावेश आहे.

वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनासंदर्भात मार्गदर्शक नियमावलीची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात संचारबंदी नसून, जमावबंदी आहे. सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे. तसंच लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. लग्न समारंभ आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर पूर्वीप्रमाणेच निर्बंध राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी बुधवारी दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. त्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागासह इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT