covid 19 update 
पुणे

Corona Update - पुणे जिल्ह्यात 368 नवे रुग्ण; 16 जणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.१७) दिवसभरात एकूण ३६८ नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोना रुग्णांत पुणे शहरातील १६३ जण आहेत. दिवसभरात ३ हजार १३९ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.   

दरम्यान, गेल्या २४ तासांत ४२० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूपैकी पुणे शहरातील सहा, पिंपरी चिंचवड पाच, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील चार आणि नगरपालिका क्षेत्रातील एका  रुग्णाचा समावेश आहे. आज कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुणे जिल्ह्यात सध्या विविध रुग्णांलयात ३ हजार ९३२ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय ५ हजार ३१४  रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख ३२ हजार १४५ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख १४ हजार ८६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ८ हजार १९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३८५ रुग्ण आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये ९५, जिल्हा परिषद क्षेत्रात ८९, नगरपालिका क्षेत्रात १५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ६ नवे रुग्ण सापडले आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT