fight with corona e-sakal
पुणे

पुणे जिल्ह्याला मोठा दिलासा! नव्या रुग्णसंख्येत घट

शरयू काकडे

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. कडक निर्बंध आणि लॉकडाऊनमुळे पुणे शहरातील रुग्णांची संख्या नियंत्रणात आली मात्र ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या जास्त असल्याचे चित्र काही दिवसांपासून दिसत होते. मात्र पुणे जिल्ह्यातही नव्या रुग्णांच्या संख्ये हळू हळू घट होत असल्याचे दिसत आहे. (Corona Update Pune District New Corona Positive Count decline)

गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण १५२४ रुग्ण आढळले असून त्यापैकी शहरात 384 , पिंपरी चिंचवड ८६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्र ६७३, नगरपालिका क्षेत्र १५२, कॅंटोन्मेंट बोर्ड २९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या आधी सोमवारी जिल्ह्यात 1083 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोना रुग्णांची आकडेवारी 2 हजारच्या आत आली आहे. दरम्यान सलग दुसऱ्या ही आकडेवारी 2 हजारच्या खालीच राहिली आहे.

मंगळवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात 3621 तर शहरात 858 रुग्ण कोरोनामुक्त झाले. शहरातील एकूण कोरोनामुक्तांचा आकडा 45609 वर पोहचला आहे तर एकूण बाधितांचा आकडा 470311 वर पोहचला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यापैकी 28 रुग्ण शहरातील होते. दरम्यान शहरातील एकूण मृत्यूंचा आकडा 8284 वर पोहचला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात शहरात 5964 रुग्णांची कोरोना चाचणी झाली असून एकूण 25 कोटी 2 हजार 701 नागरिकांची कोरोना चाचणी झाली आहे. सध्या शहरात एकूण 5518 रुग्णांवर उपचार सुरु असून 784 रुग्ण गंभीर स्थितीमध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi preparing sweets Video : राहुल गांधींनी तळली इमरती अन् बनवले बेसनाचे लाडू ; दुकानदार म्हणाला ‘’आता फक्त..’’

'जयाने जर पांढरी साडी घातली...', अमिताभ बच्चन यांच्या आई निर्मात्याला म्हणाल्या.... 'तुझं जगणं...'

Diwali Offer : १०० रुपयांचा रिचार्ज करा अन् Silver Coin जिंका, 'या कंपनीची भन्नाट ऑफर, आज शेवटचा दिवस...

Pune Cyber Crime : पुण्यात सायबर गुन्ह्यांची वाढ; ज्येष्ठ नागरिकांची बचत धोक्यात! बँक आणि पोलिसांनी समन्वय साधावा, तज्ज्ञांचा सल्ला

Latest Marathi News Live Update : जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ आमने-सामने

SCROLL FOR NEXT