Corona Update Pune Highest Cases one day 2758 New Corona Patient found  
पुणे

पुणेकरांनो, आता काळजी घ्या! कोरोना रुग्णांचा नवा उच्चांक

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील एकाच दिवसांत २ हजार ५८७ नवीन कोरोना रुग्ण सापडण्याचा उच्चांक बुधवारी (ता.१७) नोंदला गेला आहे. शहरात गेल्या वर्षभरात आज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने एका दिवसातील नवे रुग्ण नोंदले गेले आहेत. याआधीचा उच्चांकी आकडा हा २ हजार १२० रुग्णांचा होता. आजच्या या नवीन उच्चांकांने याआधीचा उच्चांक मोडला गेला आहे.याआधी पुणे शहरात १५ सप्टेंबर २०२० ला दिवसात २ हजार १२० नवीन रुग्ण सापडण्याचा उच्चांक नोंदला गेला होता. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रोज प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या कोरोना रुग्णांच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.


दरम्यान, आज दिवसभरात जिल्ह्यात ४ हजार ७४५ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील १ हजार २४८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६४१, नगरपालिका हद्दीतील २१७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५२ नवीन रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय दिवसभरात १ हजार ९७३ जण कोरोनामुक्त झाले असून अन्य १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील ११ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील तीन आणि नगरपालिका हद्दीतील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज जिल्हा परिषद आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Ganpati Decoration 2026: कागदी कमळ, केळीची पाने अन् कापसाचे ढग; यंदा गणपती सजावटीसाठी ट्राय करा १० भन्नाट अन् सोप्या आयडिया!

Pune Water Supply: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

SCROLL FOR NEXT