Corona
Corona  sakal
पुणे

पुणे : झोपडपट्टीमध्ये साथ नियंत्रणात, तर सोसायट्यांमध्ये धोका

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : दाट लोकवस्ती, लहान घरे असलेल्या झोपडपट्टीच्या भागात कोरोनाच्या (Corona) संक्रमणाचा धोका असला तरी प्रत्यक्षात या भागापेक्षा सोसायट्यांमध्येच कोरोनाचे लागण होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे महापालिकेच्या (corporation) आकडेवारीवरून समोर आले आहे. औंध-बाणेर-बालेवाडी, कोरेगाव पार्क, हडपसर, कोथरूड या भागातच बहुतांश रुग्ण आहेत. गेल्या पाच दिवसात सर्वाधिक १२९७ रुग्ण औंध, बाणेर भागात आढळले आहेत. तर सर्वात कमी १४० रुग्ण भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. (Pune corona Updates)

कोरोनाच्या पहिल्या लाटेत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील लोहियानगर, कासेवाडी,रविवार पेठ, महात्मा फुले पेठ यासह इतर भागात मोठ्याप्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला होता. ओमिक्रॉनाच विषाणू वेगात पसरत असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत देखील याच भागात जास्त प्रसार होईल अशी शक्यता होती त्यामुळे महापालिकेने तयारी सुरू केली होती. पण शहरात जशी रुग्णसंख्या वाढत असली तरी भवानी पेठ, कसबा पेठ,कोंढवा, येरवडा परिसरात साथ नियंत्रणात आहे.

७ जानेवारीला शहरात तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक २७५७ रुग्ण शहरात नव्याने नोंद झाले, त्यापैकी बहुतांश रुग्ण हे औंध, हडपसर, नगर रस्ता, कोथरूड या भागातील सोसायट्यांमधील रहिवासी होते. तर झोपडपट्टीचा बहुतांश भाग असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत रुग्णसंख्या ही १००च्या आतच असल्याचे समोर आले आहे. यात प्रामुख्याने जनता वसाहत, भवानी पेठ, ताडीवाला रस्ता, पाटील इस्टेट, लोहियानगर या भागाचा समावेश आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली असली तरी ती झोपडपट्टी किंवा वस्ती भागात नियंत्रणात आहे. सोसायट्यांच्या परिसरात मात्र, साथ वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

३ ते ७ जानेवारीतील रुग्णसंख्या क्षेत्रीय कार्यालय निहाय

क्षेत्रीय कार्यालय - रुग्णसंख्या

  • औंध बाणेर - १२९७

  • भवानी पेठ - १४०

  • बिबवेवाडी - ४३१

  • धनकवडी-सहकारनगर - ४८८

  • ढोले पाटील रस्ता - ४८८

  • हडपसर - १०३१

  • कसबा-विश्रामबाग - २३५

  • कोंढवा-येवलेवाडी - ३९९

  • कोथरूड-बावधन - ८३२

  • नगर रस्ता - १०२८

  • शिवाजीनगर - ४४६

  • सिंहगड रस्ता - ३४२

  • वानवडी - ३७१

  • वारजे-कर्वेनगर -५२६

  • येरवडा - ३४०

‘‘गेल्या काही दिवसांपासूनच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास झोपडपट्टी, वस्ती असलेल्या भागात कोरोनाची साथ नियंत्रणात आहे. पण सोसायट्यांचे प्रमाण जास्त असलेल्या भागात वेगात रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी शहरातील सर्वच नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.’’

- डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना प्रॉक्सी उमेदवार पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT