Corona_Patient 
पुणे

Corona Updates: पुण्यात रुग्णांनी ओलांडला ८ हजारांचा टप्पा; दिवसभरात ६५ रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Coronavirus Updates: पुणे : पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यूंच्या संख्येने गुरुवारी (ता.१) दहा हजारांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत जिल्ह्यात दहा हजार ३९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील पाच हजार ५०६ जण आहेत. जिल्ह्यात आज ८ हजार ११ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण नव्या रुग्णांत शहरातील ४ हजार १०३ जण आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ६४ हजार ८३८ झाली आहे. यापैकी १५ हजार ५०५ रुग्णांवर विविध रुग्णांलयात उपचार चालू आहेत.

दिवसभरात तब्बल ६५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण
मृत्यूंमध्ये शहरातील ३५ मृत्यू आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये १५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १०, नगरपालिका हद्दीतील आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या एकूण मृत्यूंमध्ये जिल्ह्याबाहेरील ४५८ मृत्यूंचा समावेश आहे. 

दरम्यान, गेल्या चोवीस तासात ५ हजार १७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या एकूण कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २ हजार ७७, पिंपरी चिंचवडमधील १ हजार १६१, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार
३५१, नगरपालिका हद्दीतील ३९५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३३ रुग्ण
आहेत.

आज शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार ११३,
जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार २७२, नगरपालिका क्षेत्रात ३९१ आणि
कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १३२ नवे रुग्ण सापडले आहेत. सद्यःस्थितीतील एकूण सक्रिय रुग्णांपैकी ४९ हजार ३३३ जणांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये शहरातील सर्वाधिक ५ हजार ४३९, पिंपरी चिंचवडमधील ३ हजार ३६०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४ हजार २०, नगरपालिका हद्दीतील २ हजार ३०६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३८० रुग्ण आहेत.

आज सर्वाधिक चाचण्या
जिल्ह्यात आज सर्वाधिक २९ हजार ६४६ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात
आल्या आहेत. यामध्ये पुणे शहरातील २० हजार ६८१ चाचण्यांचा समावेश आहे. शहरातील चाचण्यांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. याआधी दिवसांत कमाल १६ हजार चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT