Corona Patients Sakal
पुणे

पुणे : नवीन कोरोना रुग्णांचा आकडा गुरुवारी तीनशेच्या घरात

शहरातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांचा आकडा १०५ दिवसांच्या खंडानंतर गुरुवारी पहिल्यांदाच तीनशेच्या जवळ गेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील (Pune City) दिवसातील नवीन कोरोना रुग्णांचा (Corona Patient) आकडा गुरुवारी (ता.३०) तीनशेच्या घरात पोचला आहे. गुरुवारी दिवसांत शहरात २९८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांचा आकडा १०५ दिवसांच्या (साडेतीन महिने) खंडानंतर गुरुवारी पहिल्यांदाच तीनशेच्या जवळ गेला आहे. जिल्ह्यात दिवसभरात ४७७ नवे कोरोना सापडले आहेत.

याआधी १६ सप्टेंबर २०२१ ला पुणे शहरात दिवसात २१५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तेव्हापासून दिवसातील हा आकडा सातत्याने कमी कमी होत गेला होता. त्यानंतर तब्बल साडेतीन महिन्याच्या खंडानंतर २९ डिसेंबर २०२१ ला एका दिवसात २३२ नवे कोरोना रुग्ण आढळले होते. मंगळवारच्या (ता.२८) तुलनेत (बुधवारी) ६१ रुग्णांची वाढ झाली होती. त्यानंतर आता बुधवारच्या (ता.२९) तुलनेत गुरुवारी (ता.३०) पुन्हा ६६ रुग्णांनी वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्ण स्थितीचा अहवाल रोज रात्री प्रसिद्ध करण्यात येतो. या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

गुरुवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात आढळून आलेल्या एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील २९८ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ८०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ६९, नगरपालिका हद्दीत १० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात २० नवे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात दिवसात १३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील ३३, पिंपरी चिंचवडमधील ६७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १९, नगरपालिका हद्दीतील ६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील नऊ जण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT