Vaccination esakal
पुणे

पुणे शहरात रविवारी ७२ केंद्रांवर होणार कोरोना लसीकरण

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : महापालिकेने उद्याचे (रविवार) लसीकरणाचे नियोजन जाहीर केले असून, ५७ ठिकाणी कोव्हीशील्ड तर १५ कोव्हॅक्सीन लसीचा केवळ दुसरा डोस देण्यात येणार आहे. असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. शासनाकडून महापालिकेला ५ हजार कोव्हीशील्डचे तर ५ हजार ५०० कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार उद्या केवळ महापालिकेचे दवाखान्यांमध्येच लसीकरण होणार आहे. नगरसेवकांनी शिफारस केलेली बहुतांश केंद्र रविवारी बंद राहणार आहेत. कोव्हीशील्डचे केवळ ५ हजार डोस आहेत, तर महापालिकेकडे काही लस शिल्लक आहे, त्यामुळे ५७ केंद्रांवर प्रत्येकी १०० लसीचे डोस उपलब्ध आहेत. कोव्हॅन्सीनचे देखील १५ ठिकाणी प्रत्येकी १०० डोस आहेत.

प्रथमच १० हजार तरुणांना लस

शहरात आज एकूण ११ हजार ९८९ लसीकरण झाले आहे. १८ ते ४४ वयोगटाने एका दिवसात १० हजार लसीकरणाचा टप्पा ओलांडला असून, आज १० हजार २६८ जणांनी लस घेतली. तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी १८, फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी २०८, ज्येष्ठ नागरिक ४०४, ४५ ते ५९ वयोगटात १ हजार ९१ जणांनी पहिला व दुसरा डोस घेतला.

असे असेल आजचे लसीकरण

- कोव्हीशील्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवसांपूर्वी (६ मार्च ) घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस मिळेल. - दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस

- पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांसाठी ६० टक्के डोस

- ऑनलाइन बुकिंग रविवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल.

- पहिल्या डोससाठी थेट केंद्रांवर जाणारे आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन कर्मचारी व ४५ च्या पुढील नागरिकांसाठी २० टक्के डोस

- २ मेपूर्वी पहिला डोस घेणाऱ्यांना कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस दिला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT