corona vaccination sakal
पुणे

पुण्यात आज 187 केंद्रावर लसीकरण

सूरज यादव

राज्य सरकारकडून महापालिकेला 30 हजार डोस उपलब्ध झाले असून, त्याद्वारे कोव्हीशील्ड लसीचे नियोजन केले आहे.

पुणे - महापालिकेतर्फे शहरातील 187 केंद्रांवर सोमवारी लसीकरण केले जाणार आहे. यामध्ये 15 केंद्रांवर 30 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण असेल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

राज्य सरकारकडून महापालिकेला 30 हजार डोस उपलब्ध झाले असून, त्याद्वारे कोव्हीशील्ड लसीचे नियोजन केले आहे. 157 केंद्रांवर 45 च्या पुढील नागरिकांसाठी कोव्हीशील्डचे लसीकरण असेल.ज्या नागरिकांनी 1 मार्च पूर्वी (84दिवस) पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस दिला जाईल. 40 टक्के लस पहिल्या डोससाठी उपलब्ध आहे.

आॅनलाइन बुकिंग करून येणाऱ्या नागरिकांच्या पहिल्या डोससाठी 40 टक्के लस आहे. 20 टक्के लस फ्रंटलाइन कर्मचारी व थेट केंद्रावर गेलेल्या नागरिकांसाठी उपलब्ध आहे. 30 ते 44 वयोगटासाठी 15 केंद्रावर लसीकरण होईल. 60 टक्के लस आॅनलाइन बुकिंगसाठी राखीव आहे, तर थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी 40 टक्के लस शिल्लक आहे.

कोव्हॅक्सीनचे 15 केंद्रावर लसीकरण केले जाईल. ज्या 18 वयाच्या पुढील नागरिकांनी पहिला डोस 23 मे पूर्वी घेतला आहेत त्यांना दुसरा डोस दिला जाईल. 60 टक्के लस आॅनलाइन बुकिंगद्वारे तर 40 टक्के लस थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी आहे. आॅनलाइन बुकिंग सकाळी आठ वाजता सुरू होईल, असे प्रशासनाने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT