vaccination 
पुणे

अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक; 10 एप्रिलपासून अंमलबजावणी

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे- पुणे शहरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व संस्था, कार्यालये, हॉटेल, दुकानांसह खासगी आस्थापना, इ-कॉमर्स, खासगी वाहनचालक व वाहतुकीची संबंधित अन्य कर्मचारी, दहावी, बारावीच्या परीक्षेशी संबंधित शिक्षक, कर्मचारी, बांधकाम कामगार, वृत्तपत्र वितरण करणारे कर्मचारी, मंगल कार्यालयातील कर्मचारी, उत्पादन क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्याचे बंधनकारक केले आहे. लसीकरण न झालेले कर्मचारी आणि कामगारांना १५ दिवसांची वैधता असलेले आरटीपीसीआर या कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे अनिवार्य आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार तर, संबंधित आस्थापनांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. या निर्णयाची येत्या १० एप्रिलपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.

अत्यावश्‍यक सेवांचे कर्मचारी, दहावी, बारावीच्या परीक्षेशी संबंधित शिक्षक व कर्मचारी, बांधकाम कामगार आणि कोरोनापासून सुरक्षेची उपाययोजना म्हणून पारदर्शक काच, अन्य साहित्याचे सुरक्षा कवच लावणाऱ्या आस्थापना, स्वतःभोवती प्लॅस्टिक शीट लावणाऱ्या वाहनचालकांना दंडात्मक कारवाईतून वगळण्यात आले आहे. मात्र या सर्वांनी लवकरात लवकर कोरोना लसीकरण करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय सरकारी कार्यालयात कामांसाठी येणाऱ्या सर्व अभ्यागतांना (व्यक्तींना) ४८ तासांची वैधता असलेले कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बाळगावे लागणार आहे.

राजेशे टोपेंनी सांगितला कोरोनाला रोखण्याचा रामबाण उपाय

खासगी आस्थापनांसाठी अटी

- सर्व कर्मचाऱ्यांची थर्मामिटर, प्लस आॅक्सिमिटरद्वारे नियमित तपासणी.
- एखादा कर्मचारी बाधित आल्यास, त्याच्या संपर्कातील अन्य कर्मचाऱ्यांचे स्वखर्चाने विलगीकरण.
- ५०० पेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांनी स्वतंत्र क्वारांटाइन सेंटर सुरु करणे अनिवार्य.
- बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची निवासी सोय असलेलीच बांधकामे सुरु
राहणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT