covid test 
पुणे

‘आरटीपीसीआर’ चाचणी झाली स्वस्त; जास्त पैसे घेतल्यास दाखल होणार गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुणेकरांनो, तुम्हाला कोरोनाची चाचणी म्हणजे ‘आरटीपीसीआर’ करायची आहे? त्यासाठी खासगी प्रयोगशाळा हजार-दीड हजार रुपये घेतील, एवढे पैसे मोजू नका; कारण, या चाचणीचे भाव कमी झाले आहेत आणि ते अमलात आणण्याचा आदेशही राज्य सरकारने काढला आहे. या निर्णयानुसार चाचणीसाठी पाचशे ते आठशे रुपयेच मोजावे लागतील. त्यापेक्षा जादा पैसे घेणाऱ्या खासगी लॅबविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार ‘आरटीपीसीआर’ चाचणी करावी आणि निश्‍चित दरात करावी, अशा सूचना खासगी प्रयोगशाळांना केल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. 

पुण्यासह राज्यात कोरोनाची साथ वाढली असून, सरकारी पातळीवरील चाचण्यांपाठोपाठ खासगी प्रयोगशाळांकडे मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात म्हणजे, गेल्या वर्षी ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी दोन ते अडीच हजार रुपये दर होते. त्यात याआधी दोनदा कपात करून चाचण्यांचे दर ९८० रुपयांपर्यंत आणले होते. मात्र, आता पुन्हा ते कमी करून किमान पाचशे ते अधिक ८०० रुपये निश्‍चित केले आहे. तरीही प्रयोगशाळांकडील तंत्रज्ञ नागरिकांकडून जादा पैसे घेण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून महापालिकेने दरापेक्षा अधिक पैसे घेणाऱ्या प्रयोगशाळांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

खासगी प्रयोगशाळांकडील ‘स्वॅब’साठी राज्य सरकारने दर ठरविले असून, त्याकडे दुर्लक्ष करून जादा पैसे घेणाऱ्या प्रयोगशाळा बंद केल्या जाणार आहेत. त्याचवेळी या प्रयोगशाळांकडील ‘स्वॅब’ तपासणीची यंत्रणाही तपासण्यात येत आहे.
- डॉ. संजीव वावरे, प्रमुख, साथरोग नियंत्रण विभाग, महापालिका

पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना मृत्यूंच्या संख्येने गुरुवारी दहा हजारांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत जिल्ह्यात दहा हजार ३९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील पाच हजार ५०६ जण आहेत. जिल्ह्यात दिवसभरात ८ हजार ११ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी एकूण नव्या रुग्णांत शहरातील ४ हजार १०३ जण आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ६४ हजार ८३८ झाली आहे. यापैकी १५ हजार ५०५ रुग्णांवर विविध रुग्णांलयात उपचार चालू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

हेल्मेट नसताना दुचाकी भरधाव वेगात पळवली; वाटेतच डंपरची धडक बसली अन्... तरुणाच्या डोक्याची झालेली दशा पाहून नागरिकांचं काळीज चिरलं

Trending News : रात्रभर बाईक चालू ठेवली; घरात विषारी धूर..एकाच कुटुंबात ४ व्यक्तींचा गुदमरून मृत्यू, राज्यभर खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

SCROLL FOR NEXT