पुणे

बॅंकांमध्ये वाढतेय गर्दी 

गौरव मुठे

पुणे - "कोरोना'चा संसर्ग टाळण्यासाठी शहरात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना "वर्क फॉर्म होम' सांगितले असून, इतर व्यावसायिक आस्थापनाही बंद आहेत. याचा विपरीत परिणाम बॅंकिंग सेवांवर झाला. बहुतांश नागरिकांनी मार्चअखेरची कामे उरकण्यासाठी बॅंकांकडे पावले वळविली आहेत. यामुळे सार्वजनिक; तसेच खासगी क्षेत्रातील बॅंकांमध्ये नागरिकांची गर्दी असल्याचे चित्र आहे. 

सार्वजनिक; तसेच खासगी क्षेत्रातील काही बॅंकांनी तंत्रज्ञानाशी संबंधित काही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. मात्र, बॅंकांमध्ये तांत्रिक अडचणी घेऊन ग्राहक येत असल्याने बॅंकांतील कर्मचाऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. बॅंकांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु वाढलेल्या गर्दीमुळे बॅंक कर्मचारी चिंतेत पडले आहेत. 

""बॅंकांमध्ये गर्दी जास्त वाढली आहे. अनेक कंपन्यांनी "वर्क फॉर्म होम' सांगितल्याने बॅंकेत येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली असल्याने बॅंकांतील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्राहकांनी ऑनलाइन सेवांचा वापर करून गर्दी टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे,'' असे सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

""कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाइन बॅंकिंग व्यवहार करणे योग्य आहे. तरीही बॅंकेतील गर्दी कमी झालेली नसून ग्राहक बॅंकेत गर्दी करीत आहेत; तसेच तंत्रज्ञानाशी संबंधित काही बॅंक कर्मचाऱ्यांना "वर्क फॉर्म होम' दिले असून, काही तांत्रिक काही अडचण आल्यास बॅंक कर्मचाऱ्यांसमोरील समस्या वाढत आहेत,'' असे खासगी बॅंकेतील महिला बॅंक कर्मचाऱ्याने सांगितले. 

नागरिकांना आवाहन नोटांचा वापर टाळा 
"कोरोना'चा प्रसार वाढण्याच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी व्यवहार करताना नोटांचा वापर टाळायला हवा. व्यवहार करण्यासाठी नोटांचा वापर टाळून "डिजिटल पेमेंट' पर्यायांचा वापर करणे गरजेचे आहे. वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी "डिजिटल पेमेंट'च्या माध्यमातून म्हणजेच एनईएफटी, आयएमपीएस, यूपीआय यासारख्या पर्यायांचा वापर करावा. मोबाईल बॅंकिंग, इंटरनेट बॅंकिंग वापरून नागरिक रोजचे व्यवहार पूर्ण करू शकतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरला, पुणे रेल्वे स्टेशनवरील घटना, नेमकं काय घडलं?

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ! फॉर्मात असलेल्या खेळाडूची स्पर्धेतून माघार, फ्रँचायझीने त्याच्या जागी कुणाला घेतले पाहा...

Telangana Politics : तेलंगणच्या राजकारणात कन्येचे वडिलांना आव्हान; ‘बीआरएस’ला कविता यांची ‘टीआरएस’ धक्का देणार?

Nashik News : ‘टीसीएस’मधील दानिशच्या मोबाईलचा ‘क्लोनिंग’ अहवाल ‘एसआयटी’कडे

विदर्भात उष्णतेची लाट कायम; सोमवारी अमरावती सर्वाधिक हॉट, ४६.६ अशं तापमानाची नोंद; अकोल्याला टाकलं मागे...

SCROLL FOR NEXT