corona virus lockdown restrictions will release 20 percent pune city 
पुणे

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; शहराचा 20 टक्के भाग आता होणार खुला

सकाळ डिजिटल टीम

पुणे Coronavirus : महापालिकेने शहराचा सुमारे 80 टक्के भाग सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून रविवारी रात्री जाहीर केला. त्यामुळे तेथे सध्याचीच परिस्थिती कायम राहणार आहे. लॉकडाउनच्या शिथिलीकरणाचे फायदे तेथे मिळणार नाही. मात्र, सिंहगड रस्ता, औंध-बाणेर, वारजे-कर्वेनगर या भागाला शिथिलीकरणाचे फायदे मिळतील. तेथे अत्यावश्यक वस्तू व सेवांशिवाय काही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 तर, त्या बाहेरील क्षेत्रात सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान दुकाने खुली राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मायक्रो कंटेन्मेंट झोन
पुणे शहरातील महापालिकेच्या 15 पैकी 12 क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारितील सुमारे 80 टक्के भाग रविवारी रात्री सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) म्हणून जाहीर करण्यात आला. त्याच्या सीमा पोलिस सील करणार असून त्याअंतर्गत जीवनावश्यक वस्तू आणि सेवा ठराविक वेळेत नागरिकांना मिळतील. या भागातून कोणाला बाहेर पडता येणार नाही किंवा आत जाता येणार नाही. लॉकडाऊन शिथिलीकरणाचे फायदे या भागाला मिळणार नाहीत. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या वाहतुकीसाठी पोलिसांच्या पासची गरज नसेल. या भागातील दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान, खुली राहणार आहेत.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील संक्रमणशील भाग

  • कसबा - विश्रामबागवाडा
  • भवानी पेठ
  • कोंढवा येवलेवाडी
  • कोथरूड - बावधन
  • ढोले पाटील रोड
  • शिवाजीनगर - घोले रोड
  • धनकवडी – सहकारनगर
  • नगर रोड - वडगाव शेरी
  • बिबवेवाडी
  • येरवडा, कळस, धानोरी
  • वानवडी, रामटेकडी
  • हडपसर - मुंढवा 

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात या भागाला शिथिलीकरणाचे फायदे

  • सिंहगड रस्ता
  • औंध, बाणेर
  • वारजे, कर्वेनगर

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी होणार अंमलबजावणी

  • दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान खुली राहतील
  • निवासी भागातील अत्यावश्यक सेवांशिवाय प्रत्येकी पाच दुकाने त्या-त्या भागात सुरू राहणार
  • या भागात मद्यविक्रीची दुकाने ठरविक वेळेत काही अटींवर खुली राहतील
  • अत्यावश्यक वस्तू ई-कॉमर्सद्वारे घरपोच मिळतील
  • बांधकामांना लॉकडाउनच्या शासकीय अटींनुसार परवानगी
  • पोलिसांनी परवानगी दिलेल्या दुचाकी आणि मोटारींची वाहतूक करता येईल
  • दुचाकीवर एकच तर मोटारीत चालकाशिवाय दोघांना बसता येईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT