Corona will now be diagnosed by coughing 
पुणे

काय सांगता? आता खोकल्याच्या आवाजातून होणार कोरोनाचे निदान

सकाळवृत्तसेवा

पुणे : श्वसनाशी निगडित आजार असलेल्या कोरोनाचे व्यक्तीच्या खोकण्याच्या आवाजातून निदान करणे शक्‍य झाले आहे. वाधवानी इंस्टिट्यूच्या कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने यासाठी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. यामुळे लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांचेही निदान शक्‍य होणार असून, याचे तात्पुरता स्वामित्व हक्क प्राप्त केला आहे. 

मुख्य संशोधक आणि संस्थेचे नवकल्पना अधिकारी डॉ. राहुल पानीक्कर म्हणाले,"मोठ्या लोकसंख्येचे निदान जलद गतीने होणे हे कोराना विरुद्धच्या युद्धाचे मुख्य शस्त्र आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत सामान्यांना परवडेल आणि अधिक अचूक निदान करेल असे तंत्रज्ञान आम्ही विकसित केले आहे.'' या यंत्रणेमुळे निदानाचा वेग 43 टक्‍क्‍यांनी वाढेल असा दावा संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. 

 कसे झाले संशोधन? 
- महाराष्ट्र, बिहार, ओरिसा आणि राजस्थानमधील 3 हजार 621 जणांची निवड करण्यात आली. 
- त्यापैकी 2,001 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. 
- यासर्वांचे खोकण्याचे आवाज मुद्रित करण्यात आले 
- तसेच, कोरोना नसलेल्या 31,909 प्रकारचे आवाज घेण्यात आले 
- त्यापैकी 4,793 खोकण्याचे आवाज होते, तर उरलेले इतर आवाज होते 
- या सर्व आवाजांच्या माहितीवर प्रक्रिया करून एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले 
- आवाजांमधील बदलाच्या आधारे कोरोनाचे निदान यात होते 


तंत्रज्ञानाचे फायदे  
- आवाजाच्या आधारे कोठूनही जलद निदान करणे शक्‍य 
- निदानाच्या वेगाबरोबरच खर्चाची बचत होईल 
- प्रयोगशाळांवरील तान कमी होईल 
- अंतिम निदानासाठी आरटी-पिसीआर टेस्ट करणे आवश्‍यक 

(आलेख करावा) 
आवाजाची तीव्रता (एकक ः हर्टझ) ः 
लक्षणे ः कोरोना पॉझिटिव्ह ः कोरोना निगेटिव्ह 
लक्षणे नसलेले ः 178 ः 464 
खोकला ः 37 ः 54 
ताप ः 40 ः 59 
खोकला आणि ताप ः 57 ः 42 
श्‍वास घेण्यास अडथळा ः 4 ः 11 


''निदानाची अचूकता अधिक वाढविण्यासाठी नमुन्यांची संख्या आम्ही वाढवत आहोत. तसेच, कोरोनाच्या जलद निदानाची आवश्‍यकता असलेल्या गरजू लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी संशोधनाची व्याप्ती जागतिक स्तरावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.''
- डॉ. राहुल पानीक्‍कर, मुख्यसंशोधक 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT