Murlidhar-Mohol 
पुणे

सवलती देत दुकाने सुरू केल्याने कोरोना आणखी पसरणार - मुरलीधर मोहोळ

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात काही दुकाने उघडण्यासह "लॉकडाउन'मध्ये सवलती देण्याच्या महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार विरोध केला आहे. पुणेकर आजघडीला सुरक्षित नाहीत; तेव्हा या सवलती घातक ठरतील, अशी भीती व्यक्त करीत, येत्या 17 मेपर्यंत कडकडीत बंद पाळण्याचा सल्ला महापौर मोहोळ यांनी दिला आहे. अशा निर्णयातून काही घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थितीत केला आहे. 

पुणे शहरात रोजच्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, लॉकडाउनमध्ये शिथिलता आणून शहराच्या 97 टक्के भागांतील व्यवहार काही प्रमाणात सुरू करण्यात आले आहेत. त्यानंतर दिवसभर लोकांची सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. त्यातून कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती महापौरांनी व्यक्त केली आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, 'सध्या कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तरीही, नव्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. ही संख्या आटोक्‍यात आणण्यासाठी लॉकडाउनचे पालन केले पाहिजे. दुर्दैवाने, तसे न करता, लोकांना सवलती देत दुकाने सुरू केल्याने कोरोना आणखी पसरणार आहे. त्यामुळेच प्रशासनाच्या निर्णयाला विरोध आहे.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT