daund police 
पुणे

कोरोनाच्या लढाईत खाकी वर्दीतील 14 जणांची...  

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : मुंबई येथील कोरोना संक्रमण झालेल्या "रेड झोन'मध्ये बंदोबस्त करून दौंड तालुक्‍यात परतलेल्या राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातच्या 14 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे दौंड तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 9 झाली आहे. 

याबाबत एसआरपीफ गट क्रमांक सातच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली खान यांनी आज (ता. 18) माहिती दिली की, मुंबईमधील शिवाजीनगर येथे बंदोबस्ताकरिता तैनात पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेली तुकडी परतल्यानंतर त्यांना दौंड शहरात न आणता नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यातील 94 पैकी 25 ते 41 वयोगटातील एकूण 15 पोलिसांना 8 मे रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी 14 जणांचे वैद्यकीय अहवाल आज प्राप्त झाले असून, ते सर्व निगेटिव्ह आहेत. एक अहवाल प्रलंबित आहे. निगेटिव्ह अहवाल आलेल्या पोलिसांना होम क्वारंटाइन केले जाणार आहे. 

दौंड तालुक्‍यात 29 एप्रिल रोजी 70 वर्षीय नागरिकास पहिल्यांदा कोरोनाची बाधा झाली होती. आजअखेर एकूण 32 कोरोना रुग्ण सापडले असून, त्यापैकी उपचारानंतर 23 जण बरे झाले आहेत. एसआरपीएफ गट क्रमांक सातचे 22 पोलिस आणि दहिटणे (ता. दौंड) येथील 70 वर्षीय नागरिक बरे झाले आहेत. गट क्रमांक सातचे 5 पोलिस, इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) 3 पोलिस आणि एक वयस्कर दूध विक्रेते, असे एकूण 9 बाधित रुग्ण असून, त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

मुंबई येथून बंदोबस्त करून परतलेले एसआरपीएफ गट क्रमांक पाच व सात आणि आयआरबीच्या पोलिसांना खबरदारीचा उपाय म्हणून दौंड तालुक्‍यातील विविध विलगीकरण कक्षांमध्ये ठेवण्यात आले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

'धाकट्या सुनबाई' मध्ये दिसणार लोकप्रिय इन्फ्लुएन्सर; कोण आहे ती? 'अशी' आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची कथा

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT