corona1
corona1 
पुणे

अरे रे, अवघ्या दहा महिन्याच्या बाळाला कोरोना

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून, आज अवघ्या दहा महिन्याच्या बाळाला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. शहरात दोन महिला, दोन पुरूष व बाळासह एकूण पाच जणांना बाधा झाली आहे.

दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून ५२ जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी १६ जुलै रोजी आलेल्या अहवालानुसार पंचशील चित्रपटगृह परिसर- शिवाजीनगर येथील चार व भीमनगर येथील एक, असे एकूण ५ जणांना बाधा झाली आहे. बाधितांमध्ये १६ व २५ वर्षीय पुरूष, ४८ व ५१ वर्षीय महिला आणि दहा महिन्याच्या मुलाचा समावेश आहे. दहा महिने वय असलेल्या बाधित मुलाच्या वडिलांना देखील कोरोनाची बाधा झाली असून, आईचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती उप जिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. 
                 

दौंड तालुक्यात यापूर्वी खुटबाव येथे दोन वर्षाच्या मुलीला १८ जून रोजी कोरोनाची बाधा झाली होती व उपचारानंतर ती बरी देखील झाली. परंतु, आज दौंड शहरात अवघ्या दहा महिन्याच्या बाळाला कोरोना विषाणूने ग्रासल्याने चिंतेत भर पडली आहे. दौंड शहरात १ ते १५ जुलै या कालावधीत तब्बल ५६ जणांना बाधा झाली आहे. 
  
Edited By : Nilesh J shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT