Itians
Itians sakal
पुणे

‘आयटीयन्स’ची परदेशवारी कोरोनामुळे दूरच

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर कंपनीमार्फत परदेशात जाण्याची संधी मिळण्याच्या आशेवर असलेल्या अनेक आयटीयन्सच्या पदरी अजूनही निराशाच आहे.

पुणे - कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर कंपनीमार्फत परदेशात जाण्याची संधी मिळण्याच्या आशेवर असलेल्या अनेक आयटीयन्सच्या पदरी अजूनही निराशाच आहे. कोरोनामुळे बदललेली कामाची पद्धत, रशिया-युक्रेन युद्ध आणि आरोग्यविषयक बाबींमुळे सध्या अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना परदेशात पाठविणे टाळत आहेत. त्यामुळे अनेक आयटीयन्सची परदेशवारी अजूनही दूरच असल्याचे सध्याचे चित्र आहे.

आयटी कंपन्यांकडून एखादा प्रकल्प पूर्ण करणे किंवा कायमस्वरूपी कामासाठी कर्मचाऱ्यांना परदेशात पाठविले जाते. मात्र, गेल्या काळात कोरोना संसर्ग व लॉकडाउनमुळे कंपन्यांकडून आयटीयन्सला परदेशात पाठविण्याचे प्रमाण अत्यल्प झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सध्या कंपन्या पुन्हा कर्मचाऱ्यांना परदेशात पाठवू लागल्या आहेत. मात्र, कोरोना पूर्वीच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे.

ही आहेत कारणे...

  • कर्मचाऱ्याला परदेशात पाठविल्यानंतर पगारवाढ द्यावी लागते.

  • तो पुन्हा देशात आल्यानंतर त्याचे वेतन वाढवावे लागते.

  • परदेशी कंपन्यांनी सध्या ‘प्रोजेक्ट’चा आर्थिक भार उचलणे बंद केले

  • खर्च वाढल्याने कर्मचाऱ्यांना परदेशात पाठविण्याचे प्रमाण कमी केले.

  • कोरोनामुळे निर्माण झालेली आरोग्याची स्थिती

जानेवारी २०२० मध्ये मला कंपनीने अमेरिकेत पाठविण्याचे निश्‍चित केले होते. मात्र, कोरोनामुळे सर्व नियोजन बिघडले. त्यानंतर एकदा मला तिकडे जाण्याबाबत विचारणा झाली. मात्र, कोरोनाचा विचार करता जाणे टाळले. माझी आता जाण्याची तयारी आहे, पण कंपनी पाठवत नाही.

- दिव्या, आयटीयन

कॉस्ट कटिंग, वर्क फ्रॉम होमचे कल्चर, आरोग्याची काळजी, व्हिजाच्या धोरणात झालेले बदल यासह विविध कारणांमुळे कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना परदेशात नोकरीस पाठविण्याचे प्रमाण कमी झाले. वैयक्तिक परदेशात नोकरीला जाणाऱ्यांची संख्या कोरोनानंतर काहीशी कमी झाली आहे. वेतन वाढीचा खर्च टाळण्यासाठी कंपन्या कर्मचाऱ्यांना देशातूनच ‘प्रोजेक्ट’चे काम करण्यास सांगत आहेत.

- हरप्रीत सलुजा, अध्यक्ष, नेसेन्ट इनफॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी एम्प्लाईज सिनेट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT