test 
पुणे

लक्षणे नसणारे रुग्ण अधिक धोकादायक; वाचा काय काळजी घ्यावी

सकाळ वत्तसेवा

पुणे -देशात निदान झालेल्या कोरोना रुग्णांपैकी तब्बल ६९ टक्के रुग्णांना कोणत्याच प्रकारची लक्षणे दिसली नाहीत. अशा रूग्णांपासून कोरोना प्रसाराचा अधिक धोका असून, त्यांनी जास्तीतजास्त विलगीकरणात राहणे आणि आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे भारतीय वैद्यक संशोधन संस्थेने (आयसीएमआर) स्पष्ट केले आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि ‘आयसीएमआर’च्या वतीने वेळोवेळी यासंबंधी निर्देश देण्यात आले आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्त सौरभ राव यांनीही शुक्रवारी पत्रकार परिषदेत अशा लक्षण न दिसणाऱ्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.

लक्षणे न दिसणारे रूग्ण
कोरोना विषाणूंची बाधा होऊनही ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास अडथळा अशी कोणतीही लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांना ‘असिम्प्टोमॅटीक’ रूग्ण म्हणून ओळखले जाते. अशा रुग्णांमधील कोरोनाचे निदान प्रत्यक्ष चाचणी झाल्याशिवाय करता येत नाही. बहुतेक वेळा विषाणूची लागण झाल्यानंतर सुरुवातीचे सात दिवस कोणतेही लक्षणे दिसत नाही.

धोका काय?
लक्षणे दिसत नसल्यामुळे अशा रुग्णापासून कोरोनाच्या प्रसाराचा धोका अधिक आहे. त्यांचे विलगीकरण केले नसल्यामुळे त्यापासून इतरांना प्रसार होतो. तसेच संबंधित रुग्णाला याची जाणीव नसल्याने त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची बाधा होईल. वयोवृद्ध किंवा सहव्याधी असलेल्या रुग्णाला कोरोनाची बाधा होऊन तो अत्यवस्थ (क्रिटिकल) अवस्थेत जाण्याची जास्त शक्यता असल्याचे हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटचे आशिष झा यांनी एका शोधपत्रिकेत स्पष्ट केले आहे. लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णापासून प्रसाराचा दर जरी कमी असला तरी त्याची ओळख न पटल्यामुळे त्यापासून अधिक धोका आहे. अशा व्यक्तींना छुपे ‘सुपरस्प्रेडर’ म्हणून ओळखले जाते. 

ही काळजी घ्यावी..
- आपण जर कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलो असू तर तातडीने चाचणी करून घ्यावी
- लक्षणे दिसत नसतानाही आपल्याला कोरोना झाला असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने गृहविलगीकरणात राहा
- घरातील इतर सदस्यांपासून सहा फुटांचे अंतर ठेवा, त्रीस्तरीय मास्कचा वापर करावा
- बाहेर पडताना प्रत्येकाने मास्क लावणे अनिवार्य आहे
- देशातील ८० टक्के रुग्णांना लक्षणे दिसत नसल्यामुळे सर्वांनी विशेष काळजी घ्यायला हवी
- श्वसनाशी निगडित कोणतीही समस्या असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा
- सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, शारीरिक अंतर ठेवावे
- सहव्याधी किंवा दुर्धर आजार असलेल्या रुग्णांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway: कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसचे डबे वाढणार, लांब पल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Marriage Blessing Temple India : अजूनही 'सिंगल' आहात? लग्न ठरत नाहीये? 'या' प्राचीन मंदिरात कमरेला माळ बांधून फक्त 9 प्रदक्षिणा मारा, मग लग्न ठरलंच म्हणून समजा...!

Gudi Padwa 2026: यंदा गुढी पाडवा 18 की 19 मार्चला? जाणून घ्या तारीख, वेळ, शुभ मुहूर्त अन् सणाचे महत्त्व

Love Marriage : 'या' ठिकाणी मुलींच्या लव्ह मॅरेजला फूल पर्मिशन; आवडला पुरुष की कर लग्न! वाटेल तेव्हा घटस्फोट, शेजारील देशाशी आहे संबंध

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये दोन वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृ्त्यू

SCROLL FOR NEXT