Corona
Corona esakal
पुणे

कोरोनावर मात करण्यासाठी गाईचा चीक पूरक - संशोधन

सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

इम्युमोग्लोब्युलिनमुळे व्याधीप्रतिकारशक्ती वाढते; संशोधन प्रसिद्ध

पुणे : कोरोना रुग्णाला गाईचा चीक (खरवस) आहार म्हणून दिल्यास, चीकातील इम्युनोग्लोब्युलिनमुळे व्याधी प्रतिकारशक्ती (पॅसीव इम्युनिटी) वाढण्यास मदत होते. पर्यायाने रूग्ण लवकर बरा होतो, असा दावा वैद्यकीय आहारातज्ज्ञ डॉ. स्वाती खारतोडे यांनी केला आहे. यासंबंधीचा शोधनिबंध ‘जर्नल ऑफ रिसर्च इन मेडिकल अँड डेंटल सायन्सेस’ या शोधपत्रिकेत प्रकाशित झाला आहे.

डॉ. खारतोडे यांनी २०० रुग्णांवर केलेल्या तुलनात्मक अध्ययनातून ही बाब समोर आली आहे. पुण्यातील विश्र्वराज रूग्णालयात दाखल कोरोना बाधितांवर त्यांनी ही चाचणी केली. त्या म्हणाल्या,‘‘ज्या गटाला हे गाईच्या चीकाचे सप्लिमेंट दिलेले होते. त्यांच्यामध्ये लवकर बरे होण्याचे प्रमाण दिसून आले. त्यांचा बरे होण्याचा सरासरी दिवस दुसरा ते तिसरा होता आणि जे कंट्रोल ग्रुपमध्ये होते, ज्यांना सप्लिमेंट दिले नव्हते, त्यांचा बरे होण्याचा सरासरी दिवस सहावा ते आठवा होता.’’ गाईच्या चिकासोबतच म्हशीचा, शेळीचा चीक सुद्धा तेवढाच उपयुक्त आणि पोषक आहे. फक्त हे संशोधन गाईच्या चिकावर करण्यात आल्यामुळे इथे फक्त गाईचा चिकाचा उल्लेख करण्यात आला आहे.

कोणता चीक खाल?

चिक शुद्ध स्वरूपात (खरवस) मिळत असेल, तर तो नक्की खावा किंवा त्यापासून बनविलेले सप्लिमेंट खावे. फक्त ते ‘फ्रोझन ड्राईड किंवा फ्रीझ ड्रायिंग’ या पद्धतीनुसार बनवलेले पाहिजे, म्हणजे त्यामधील इम्म्युनोग्लोब्युलिनचा नाश होत नाही.

चीकातील पौष्टिक द्रव्यांचा परिणाम

- विषाणूंचा संसर्ग झाल्यावर आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी त्या विषाणूला नष्ट करण्यासाठी प्रतिपींडे किंवा इम्युनोग्लोब्युलीन तयार करतात.

- गाईच्या चीकामध्ये रोगप्रतिकाशक्ती किंवा इम्युनोग्लोब्युलिन भरपूर प्रमाणात असते.

- त्यामुळे आपल्याला व्याधीप्रतिकारशक्ती ( पॅसीव इम्युनिटी) मिळते.

संशोधनाचा फायदा :

- चीकामुळे व्याधी प्रतिकारशक्ती वाढते, पर्यायाने कोरोना उपचाराला फायदा होतो

- रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठीचा उपयोग होतो.

- कोरोना काळातील पौष्टिक आहार म्हणून वापर शक्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अमित शहांनी बोरिवलीमध्ये भाड्याने घर घेतलंय- संजय राऊत

IPL 2024 DC vs RR : राजधानी 'दिल्ली'साठी आर या पार...! प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी आज राजस्थानवर विजय आवश्यक

SCROLL FOR NEXT