coronavirus lockdown marriage police initiative 
पुणे

लॉकडाउनमधले आगळे वेगळे लग्न; हडपसर पोलिसांनी केले कन्यादान 

संदीप जगदाळे

हडपसर - वर व वधूच्या पालकांना लॉकडाउनमुळे लग्नाला उपस्थित राहणे शक्य नसल्याने त्यांनी हडपसर पोलिसांना कन्यादान करण्याची विनंती केली अन् वधू-वराच्या पालकांच्या या विनंतीला मान देऊन पोलिसांनी लॉकडाउनमधला हा आगळा वेगळा विवाह सोहळा अमनोरा क्लबमध्ये पार पाडला. या लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे हडपसर पोलिसांनी या वधूचे कन्यादान केले. 

हडपसर येथील वर मुलगा आदित्यसिंग बिस्ट याचे वडील डेहराडूनला कर्नल या पदावर आहेत, तर वधू मुलगी नेहा कुशवाह हीचे वडील नागपूर येथे सैन्य दलामध्ये डॉक्टर असुन, कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. मुलगा आयटीमध्ये असून मुलगी डॉक्टर आहे. दोघांच्याही पालकांना देशात चालू असलेल्या लॉकडाउन व कोरोना संक्रमणामुळे ते लग्नाला पुण्यात येऊ शकत नसल्याने सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे यांना फोन करून सदर वधू-वरांचे लग्न लावून देण्याची विनंती केली. त्यांची ही विनंती लक्षात घेऊन व दोन्ही कुटुंबे ही देशसेवेत व्यग्र असल्यामुळे वरिष्ठांची परवानगी घेऊन हडपसर पोलिसांनी लग्न सोहळा पार पडला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या लग्नाला परिमंडळ पाचचे पोलिस उपआयुक्त सुहास बावचे, हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश साठे उपस्थित होते. सहायक पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी पाटील यांनी मुलीचे कन्यादान केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

Latest Marathi News Live Update : मुंबईत कंत्राटदाराचा सातवा बळी, सरकारची ८६ हजार कोटींची थकबाकी

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT