पुणे

Coronavirus: ‘वर्क फ्रॉम होम’ची कर्मचाऱ्यांना मुभा द्या

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योजकांनी औद्योगिक घटकांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शक्‍य असल्यास घरून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) मुभा द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी केले.

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत आज बैठक झाली. या बैठकीला पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पुणे उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, संजीव देशमुख, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांच्यासह अनेक उद्योजक उपस्थित होते. या वेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘‘उद्योग क्षेत्रात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये, यासाठी औद्योगिक संस्थांनी गर्दी होणारे कार्यक्रम घेऊ नयेत.’’ हिंजवडी, चाकण, रांजणगाव, भोसरी, पिंपरी- चिंचवडसह अन्य औद्योगिक वसाहतींमधील उद्योजक आणि त्यांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्याचे आश्‍वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT