पुणे

Coronavirus : राज्यात वाढतीये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या; एकट्या पुण्यात...

वृत्तसंस्था

मुंबई : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

चीन, इटली, अमेरिकेसह भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. भारतात आत्तापर्यंत 300 हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. सध्या 11 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता हा आकडा 63 वरून 74 वर गेला आहे. 

मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू

कोरोना व्हायरसने मुंबईत यापूर्वी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईतील एका 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच 6 नव्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. 

पुण्यातही रुग्णांची संख्या वाढतीये

मुंबईनंतर पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आता पुण्यात आणखी चार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 3rd T20I : ९ चौकार, ११ षटकार.. अभिषेक शर्माच्या ३७ चेंडूंत ११३ धावा; क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना... टीम इंडियाचे वर्ल्ड रेकॉर्ड्स

Shetkari Karj Mafi Update : दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता; खात्यात जमा होणार पैसे? 4 हजार कोटींचा प्रस्ताव वित्त खात्याकडे...

Trump Controversy: ‘ड्रेस फाटला, रक्तस्राव झाला’; ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप, माजी 'मिस स्वित्झर्लंड'च्या दाव्याने खळबळ

Cabinet Meeting: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत ते पुण्यात राष्ट्रीय प्रदर्शन केंद्र... मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

MLC Election : मतदान ६२३, तर मतपेटीत ६७५ मतपत्रिका; मतमोजणीला सुरुवात होताच धक्कादायक प्रकार समोर

SCROLL FOR NEXT