Corona  
पुणे

कुंजीरवाडीतील तरुणाची अपघातानंतर केली कोरोना टेस्ट.. 

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्‍यातील शेवाळेवाडी (ता. हवेली) फाट्यावरील येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या थेऊर फाटा (कुंजीरवाडी) येथील एका पस्तीस वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेला तो कुंजीरवाडी हद्दीतील पहिला; तर पूर्व हवेलीमधील मागील पंधरा दिवसातील नववा रुग्ण आहे. 

थेऊर फाटा येथील अपघातग्रस्त युवकावर शेवाळेवाडी फाट्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने केलेल्या तपासणीत संबंधित तरुणाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याच्या वृत्तास कुंजीरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. मेहबूब लकडे यांनी दुजोरा दिला आहे. 

कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा येथील वरील युवकाचा हडपसर- सासवड मार्गावर वडकी हद्दीत शुक्रवारी (ता. 8) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला होता. त्यानंतर वडकी येथील काही स्थानिक युवकांनी त्याला हडपसर हद्दीतील गाडीतळ परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, संबंधित अपघातग्रस्त तरुणाच्या नातेवाइकास येथील उपचार आवडले नाहीत. त्यामुळे त्यास शनिवारी (ता. 9) दुपारी शेवाळेवाडी फाट्यावरील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. येथे 
केलेल्या तपासणीत तो कोरोना बाधित असल्याचे रविवारी (ता. 10) दुपारी निष्पन्न झाले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

या तरुणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजताच थेऊर फाट्यापासून तीन किलोमीटरचा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला 
आहे. थेऊर फाटा व परिसराचे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यास सुरवात केली आहे. संबंधित तरुण लॉकडाउन जाहीर झाल्यापासून घरात असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली आहे. त्यामुळे त्याला कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अपघातग्रस्त तरुणास मदत करणारे वडकी येथील स्थानिक तरुण, गाडीतळ व शेवाळेवाडी येथील खासगी रुग्णालय या सर्वांची माहिती घेण्यात येणार आहे. 
- डॉ. मेहबूब लकडे, आरोग्य अधिकारी, 
प्राथमिक आरोग्य केंद्र, कुंजीरवाडी (ता. हवेली) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT