coronavirus lockdown e-coupon system for liquor Pune city 
पुणे

मोठी बातमी : रांगेत न थांबता दारू मिळणार; पुण्यात ई-टोकनला सुरवात!

सकाळवृत्तसेवा

पुणे : आता घरात बसून दुकानदाराची अपॉइंटमेंट घेऊन त्यानुसार ग्राहकाला दारू खरेदी करता येणार आहे. त्यासाठी mahaexcise.com या संकेतस्थळावर ग्राहकाने नोंदणी केल्यावर त्याला ई-टोकन मिळेल. त्यामुळे कडक उन्हात रांगेत उभे राहून दारू खरेदी करण्याच्या त्रासापासून ग्राहकांची सुटका होणार आहे. या प्रयोगाला पुण्यात मंगळवारपासून सुरवात झाली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारने 4 एप्रिलपासून मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्यान मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास महापालिका आणि पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र, अनेक ठिकाणी प्रचंड मोठ्या रांगा लागत असल्यामुळे टोकन पद्धतीने मद्यविक्री करण्याची सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली. त्यानुसार त्याचा आराखडा निश्चित करण्यात आला असून सोमवारी सायंकाळपासून सुरवात करण्यात आली. आजपासून खऱया अर्थाने टोकन पद्धतीने ग्राहकांना मद्यखरेदी करता येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली. ही पद्धत रूळेपर्यंत ग्राहकांना नेहमीच्या पद्धतीनेही मद्यविक्री होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुणे : फिजिशिअन, भूलतज्ज्ञ डॉक्टरांची गरज असताना, आरोग्य खात्याकडून मात्र, हाडांचे, डोळ्यांचे, कान-नाक-घसा आदींचे डॉक्टर केले नियुक्त

मद्य खरेदीसाठी ई - टोकन मिळविण्यासाठी ग्राहकाला mahaexcise.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. त्यात त्याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, दारूचा कोणता प्रकार हवा आहे, आदींचा समावेश असेल. त्यानंतर त्याच्या पत्त्यातील पिनकोडनुसार ग्राहकाच्या घराजवळील मद्यविक्रीच्या दुकानांची यादी डिस्प्ले होईल. त्यावर जवळचे दुकान ग्राहकाने निश्चित करायचे. त्यावर क्लिक केल्यावर वेळांचे अर्ध्या तासांचे स्लॉटस निश्चित करण्यात आले आहेत. त्यातील हवा असलेला स्लॉट ग्राहकाने निश्चित करायचा. त्यावरून डिजिटल ई- टोकन तयार होईल. त्यानंतर ग्राहकाने त्या दुकानात जायचे, ई - टोकन दाखविल्यावर त्याला रांगेत न थांबता हवा असलेला मद्याचा प्रकार मिळणार आहे. प्रत्येक अर्ध्या तासाच्या स्लॉटमध्ये किमान 25-30 जणांना दारू मिळू शकेल.

रेशनकार्डाच्या नियमात केंद्राकडून बदल; तब्बल एवढ्या लोकांना होणार फायदा 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये 179 दुकानांत हा प्रयोग सुरू झाला आहे. पुण्यात यशस्वी झाला तर राज्यात त्याची अंमलबजावणी करण्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मानस आहे, अशी माहिती अधीक्षक झगडे यांनी दिली. ई- टोकनमुळे ग्राहकाचा रांगेत उभा रहायचा वेळ वाचणार आहे. तसेच कोरोनाच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचीही अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे, असे झगडे यांनी स्पष्ट केले. शहरात या पूर्वी काही  दुकानदारांनी गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धत स्वतःहून सुरू केली आहे. परंतु, नवी पद्धत पुण्यातील सर्वच दुकानांसाठी लागू असेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे लॉक डाउनमुळे मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली होती. बार अजूनही बंद आहेत. परंतु, दुकाने उघडल्यावर झालेली गर्दी नियंत्रीत करणे दुकानदारांसाठी डोकेदुखी ठरली होती. त्यासाठी पोलिस बंदोबस्तही देण्यात आला. तर काही ठिकाणी शिक्षकांना गर्दी नियंत्रित करण्याची ड्यूटी देण्यात आली होती. त्यावर मिडीयामधून गदारोळ झाल्यावर शिक्षकांची ड्यूटी रद्द करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link: मिसिंग लिंक मार्गावर पुणे–मुंबई वाहतूक बंद; मुंबईहून येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग सुरळीत

Kolwan Rain : जोरदार पावसामुळे कोळवण खोऱ्यातील जनजीवन विस्कळित; वळकी नदीचे रौद्र रूपामुळे अंतर्गत पुलांवरुन पाणी तर ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी

Latest Marathi News Update: दिवसभरातील पावसाचे सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Khadaki Rain : खडकी भागात मुसळधार पाऊस; गुरुद्वारा आणि टीकाराम महाविद्यालय परिसरात पाणीच पाणी

Computer Typing Examination : नाशिक जिल्ह्यातील संगणक टंकलेखन परीक्षा स्थगित; मालेगाव केंद्रावरील परीक्षा मात्र नियोजित वेळेनुसार..

SCROLL FOR NEXT