coronavirus lockdown emergency auto service for patients 
पुणे

पुण्यात पेशंटसाठी तातडीची रिक्षा; अशी मिळणार मदत!

सकाळ डिजिटल टीम

पुणे Coronavirus : रुग्णांना डॉक्टरांच्या क्लिनिकपर्यंत पोचविण्यासाठी रिक्षा पंचायतीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिशन आणि रिक्षा पंचायत यांनी एकत्र येऊन हा रुग्णसेवेसाठी आपत्कालीन रिक्षा सेवा उपक्रम सुरू केला आहे. येत्या रविवारीपासून (ता. 26) हे सेवा शहरात सुरू होणार आहे.

कोरोनाच्या उद्रेकामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडणे अवघड असते. त्यात रुग्णाला डॉक्टरांच्या दवाखान्यापर्यंत किंवा त्यांच्या रुग्णालयापर्यंत जायचे तर, वाहनाची व्यवस्था होत नाही. बस, रिक्षा बंद असल्याने डॉक्टरांपर्यंत जाणार कसे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पुण्यातील रिक्षा पंचायत आणि इंडियन मेडिकल असोसिएशन एकत्र आल्या आहेत. यात पोलिसांनी सहकार्य केले आहे.  या बद्दल अधिक माहिती देताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, “रुग्णसेवा करत असतानाच रिक्षा चालकाचे आरोग्य चांगले आणि सुरक्षित राहिले पाहिजे, यात या उपक्रमात प्राधान्य दिले आहे. त्यासाठी मार्गदर्शन सुचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी त्यांचे प्रशिक्षणसुद्धा घेण्यात येईल.” सध्या 9859198591 या मोबाईल क्रमांकावर ही सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, हा उपक्रम लवकरच शहरातील वेगवेगळ्या भागात राबविला जाणार आहे. त्यात सुमारे दोनशे रिक्षांचा समावेश असेल. शहरातील प्रत्येक भागातील रिक्षा चालकांना मोबाईल क्रमांक दिला जाईल. त्या भागातील रुग्णांना फोन करून पत्ता सांगितल्यानंतर ती रिक्षा रुग्णांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी येईल, अशी ही व्यवस्था उभारण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. रिक्षा पंचायतचे नितीन पवार म्हणाले, “आपत्कालीन रिक्षा सेवेचा उद्देश हा शहरातील रुग्णांना वाहतूकीची सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. त्यासाठी रिक्षा निर्जंतूककरण्याच्या पद्धतीचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. येत्या रविवारपासून हे प्रशिक्षण सुरू होणार असून, पहिल्या टप्प्यात दोनशे रिक्षा चालकांना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यात शहरातील वेगवेगळ्या भागातील रिक्षा चालकांचा समावेश असेल.” 

  • रोज सकाळी रिक्षा बाहेरुन स्वच्छ पाण्याने धुवा
  • रिक्षेचा आतील भाग सॅनिटाजर स्प्रे मारून स्वच्छ कपड्याने पुसा
  • एक प्रवाशीचे भाडे पूर्ण झाल्यानंतर रिक्षा पुन्हा आतून निर्जंतूक करा
  • प्रत्येक वेळी तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवून घ्या
  • हात स्वच्छ सॅनिटायजरचा वापर करा
  • रिक्षाचे मिटर, हँडल, पुढचे सिटस् यावरची सॅनिटायजरचा स्प्रे मारून पुसा
  • रिक्षा चालकाने कापडी मास्क लावावा
  • नाक आणि तोंड पूर्ण झालेले जाईल असा मास्क बांधावा
  • रोज स्वच्छ धुतलेला मास्क वापरावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात, १७ ते २५ वर्षीय ३ तरुणांचा मृत्यू; एक जण गंभीर

99 पर्सेंटाइलच्या वादानंतर सरकारचा मोठा निर्णय! आता इंजिनिअरिंग-फार्मसी प्रवेशासाठी बारावीचे मार्कही मोजणार

लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत काळाचा घाला! एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी हंबरडा फोडला; म्हणाले 'मॅनेजमेंट...'

Marathi News Live Updates : शिरूर गोळीबाराची घटना ताजी असतानाच सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून तरूणावर जीवघेणा हल्ला

RASHID KHAN: राशिद खानला कर्णधारपदावरून हटवलं, पण बातमीच मिळाली नाही? म्हणाला- ‘मलाही...’; अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT