पुणे

कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण घसरले; पुणे जिल्ह्यात मृत्यूदर दोन टक्क्यांवर 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात कोरोनाचे निदान झालेल्या प्रत्येक शंभरपैकी मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ११ वरून २ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. सलग दहा महिने कोरोनाशी झुंज देऊन कोरोनावर नियंत्रित करण्यात यश आल्याचे चित्र सार्वजनिक आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीवरून दिसत आहे. मात्र, पुणेकरांनो, धोका पूर्ण टळला नाही, हे प्रकर्षाने लक्षात घ्या. त्यामुळे मास्क, सॅनिटाझर आणि सोशल डिस्टसिंगचा काटेकोर वापर करून कोरोनाला स्वतःपासून दूर ठेवा, असा सल्लाही खात्याने दिला आहे. 

महाराष्ट्रात ९ मार्चपासून आतापर्यंत २० लाख ४१ हजार ३९८ रुग्णांना कोरोना झाला. आता हे रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण ५६०.९दिवसांपर्यंत वाढले आहे. तसेच, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९५. ७२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. असे चित्र राज्याच्या पातळीवर दिसत आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक ‘रिकव्हरी रेट’ असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

बरे होणाऱ्यांचा पुण्यात उच्चांक 
पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांना कोरोनावर उपचार करण्याचा आलेला अनुभव, उपचारासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे पुण्यात कोरोनाबाधीत रुग्ण खडखडीत बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६. ०५ टक्के आहे, असेही सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

मृत्यूचे प्रमाण नीचांकी 
पुण्यात कोरोनाचा पहिला मृत्यू ३० मार्चला झाला. त्यानंतर अवघ्या १२ एप्रिलपर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ११. ४ टक्क्यांपर्यंत वाढले. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने पुण्यातील हा मृत्यूदर २ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. 

राज्यातील कोरोनाची सद्य:स्थिती 
कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या : 20 लाख 41 हजार 398 
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी : 561 दिवस 
उपचाराखाली असलेल्या रुग्णांची संख्या : 34 हजार 934 (1.71 टक्के) 
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या : 51 हजार 280 (2.51 टक्के) 

कोरोनाचा साथरोग उद्रेक म्हणून संपत आहे. त्यामुळे नेहमी आढळणाऱ्या एखाद्या आजाराप्रमाणे तो राहील. मात्र, ब्राझील, इंग्लंडमध्ये या विषाणूंच्या जनुकीय रचनेत बदल होऊन, त्याने पुन्हा डोकं वर काढल्याचे दिसते. त्यासाठी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे अद्यापही गरजेचे आहे. 
- डॉ. प्रदीप आवटे, साथरोग सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र राज्य 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला! नाशिकची धुरा गिरीश महाजनांकडे; भरत गोगावलेंची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती

CSK New Coach: "आधी, MS Dhoni ची संघातील भूमिका काय ते निश्चित करा अन् मग कोच शोधा"; CSK ला दिग्गजाकडून स्पष्ट सल्ला

सचिन पिळगावकरांसोबत अफेअरच्या चर्चा; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं सत्य; म्हणाली- आम्ही एकमेकांना खूप...

Money Horoscope: हातात पैसा अन् नशिबात राजयोग! १८ ऑगस्टनंतर राशींचे दिवस पालटणार, नशिबाची पेटी उघडणार अन् पैशांचा पाऊस पडणार!

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

SCROLL FOR NEXT