पुणे

Coronavirus : विमानतळावरून परतणाऱ्या प्रवाशांच्या वाहतुकीसाठी पास 

सकाळवृत्तसेवा

पुणे - लोहगाव विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना मंगळवारी (ता. 24) मध्यरात्रीपर्यंत घरी परतता येणार आहे. कारण वाहतूक बंद असली तरी, पोलिसांनी कॅब व रिक्षाचालकांना विशेष पास देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी ते सायंकाळी पाचपर्यंत 34 विमानांची वाहतूक विमानतळावरून झाली. 

देशांतर्गत विमानसेवा मंगळवारपासून बंद होणार आहे. पोलिसांनी सोमवारी (ता. 23) दुपारी तीन वाजता शहरातील संपूर्ण वाहतूक बंद केली, त्यामुळे विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांची काही वेळ गैरसोय झाली. विमानतळ प्रशासनाने पोलिसांशी संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर विमानतळ पोलिसांनी कॅबचालक, रिक्षाचालक यांना प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष पास दिले. त्यात प्रवासाचा मार्ग, वाहन क्रमांक याबाबतचा परवाना पोलिसांनी दिला आहे. ही सुविधा मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत राहणार असल्याची माहिती विमानतळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पवार यांनी दिली. 

दरम्यान, लोहगाव विमानतळावरून 34 विमानांची वाहतूक सोमवारी झाली. तर, 26 विमाने रद्द झाली. आलेल्या विमानांमध्ये प्रवाशांची संख्या फारशी नव्हती. प्रवाशांनी त्यांचा प्रवास सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत पूर्ण करावा, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. लोहगाव विमानतळावरून रविवारी (ता. 22) 95 विमानांची वाहतूक झाली, त्यात चार हजार 146 प्रवासी पुण्यातून बाहेर गेले, तर दोन हजार 146 प्रवासी पुण्यात आले, अशी माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांनी दिली. 

अत्यावश्‍यक सेवेसाठीच पीएमपी 
पीएमपीने बसची सेवा शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील फक्त अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादित केली आहे. 31 मार्चपर्यंत प्रवाशांनी प्रवास टाळावा, असे आवाहन पीएमपीने केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पीएमपीची सेवा खंडित करण्याची मागणी केली होती. एसटी, रेल्वे, कॅब, रिक्षा यांची शहरांतर्गत वाहतूक सोमवारी बंद होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT