Pimpri Police Video  
पुणे

Video: पिंपरीत पोलिसाला मारहाण; आरोपीेंपैकी एक पोलिसच, व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी Coronavirus : विनाकारण रस्त्यावर फिरत असताना हटकले असता तिघांनी मिळून एका पोलिसाला मारहाण केली. ही घटना सोमवारी (ता. 27) काळेवाडीतील भारतमाता चौकात घडली. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

युनूस गुलाब अत्तार (वय 50), मतीन युनूस अत्तार (वय 28), मोईन युनूस अत्तार (वय 24, सर्व रा. श्रीकृष्ण कॉलनी, भारतमाता चौक, काळेवाडी, पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींपैकी मतीन हा पोलिस दलात कार्यरत आहे. या घटनेत शंकर विश्वभर कळकुटे असे मारहाण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  सध्या सर्वत्र संचारबंदी लागू आहे. विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे.  तरीही सोमवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास युनूस अत्तार विनाकारण रस्त्यावर फिरत असताना फिर्यादीने त्याला हटकले. यावरून युनुसने फिर्यादीशी वाद घातला. त्यावेळी युनुसची दोन्ही मुले मतीन व मोईन तेथे आले. मतीनने फिर्यादीला काठीने तर युनूस व मोईनने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या हातातील काठी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.  वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटला मान्यता, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला? राज्यपालांच्या सहीनं GR काढणार

Maratha Reservation: कुठल्या अधिकाराने तिथे बसला आहात? हायकोर्टाचा मनोज जरांगेंना सवाल, सरकारवरही ताशेरे; वाचा सुनावणीदरम्यान काय घडलं?

Latest Marathi News Updates: मराठा समाज आक्रमक; CSMT रोड वर CRP तुकड्या व अश्रूधुराच्या नळकांड्या तैनात

Aapli PMPML App: ‘आपली पीएमपीएमएल’ ॲपला उदंड प्रतिसाद, वर्षभरात ७० कोटीचे ऑनलाइन तिकीट व पास, फक्त या त्रुटी दूर करण्याची गरज

DMart Offers : डीमार्टमधून चुकूनही खरेदी करू नका 'या' वस्तू, नाहीतर तुमचं नुकसान होणारच..!

SCROLL FOR NEXT