पुणे

लग्नाला 2 हजार जणांची गर्दी, शिवसेना नेत्यासह 6 जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

पुण्यात शिवसेना नेत्याच्या पुत्राच्या लग्नात कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना नियम पायदळी तुडवले. लांडे यांच्या मुलाच्या लग्नाला जवळपास 1800 ते 2000 लोकांची गर्दी जमवल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत देवराम लांडे यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. जुन्नर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. देवराम लांडे यांच्या मुलाच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून प्रशासनाला प्रश्न विचारले जात आहेत.

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या बारव येथे महालक्ष्मी मंगल कार्यालयात दोन दिवसाचा शाही विवाहसोहळा झाला होता. हा शाही विवाहसोहळा सध्या चर्चेत आहे. या विवाहसोहळ्याला अनेक राजकीय मंडळी आजी-माजी आमदार, आजी-माजी सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती. देवराम लांडे यांच्या पुत्राच्या लग्नात कोरोना नियमाचं उल्लंघन झाल्याची फिर्याद पोलीस अंमलदार अमोल अशोक शिंदे यांनी दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारव येथील महालक्ष्मी कार्यालयाचे मालक केदारी, देवराम सखाराम लांडे, बाळू सखाराम लांडे, एकनाथ सिताराम कोरडे, चैतन्य उल्हास मिंडे आणि सुधीर नामदेव घिगे यांच्यावर जुन्नर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

देशभरात कोरोना महामारीने हाहा:कार माजवला आहे. राज्यातही कोरोनाने थैमान घातलं आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्याही आटोक्यात आलेली नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी यांचा जमावबंदीचा आदेश लागू आहे. असे असताना देखील सदर ठिकाणी देवराम सखाराम लांडे यांनी जमाव जमवून गर्दी केली आहे. त्यामुळे जुन्नर पोलीसांनी सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT