Pune-University 
पुणे

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होणार; पण स्वरूप बदलणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - 'कोरोना'मुळे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळपत्रक कोलमडले असले तरी भविष्यात सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही. परंतु, परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यासाठी विद्यापीठ गांभीर्याने विचार करत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व प्रकारच्या परीक्षा १४ एप्रिल पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. तर १ एप्रिल ते १४ एप्रिल हा कालावधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. तसा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. 

'कोरोना' संक्रमणामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याच्या पूर्वी विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांच्या पदवीच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. तर पदव्युत्तर व व्यवसायीक अभ्यासक्रमाच्या परीक्षा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. 'कोरोना'मुळे परीक्षेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रथम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार असल्याची चर्चा सुरू होती. याबाबत उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले, कोणत्याही अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द केल्या जाणार नाहीत. सर्व परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. पण या परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाव्यात यासंदर्भात विद्यापीठाकडून प्राध्यापक, प्राचार्य यांच्याकडून सूचना व उपाय मागविल्या होत्या. त्यात १०० पेक्षा जास्त सूचना व उपाय विद्यापीठास प्राप्त झाले असून, त्यांची छाननी करून नवीन परीक्षा पद्धती ठरवली जाईल. 

१३ ते १७ मार्च या कालावधीत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे काही पेपर झाले आहेत. तसेच त्यांना क्रेडिट सिस्टीम असल्याने या विद्यार्थ्यांचे द्वितीय वर्षा जाताना मूल्यांकन होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्या एमसेक्यु किंवा कमी गुणांची यासह इतर प्रकारे परीक्षा होणार आहेत. याचा निर्णय लवकरच परीक्षा मंडळात घेतला जाईल. प्रथम वर्षाची परीक्षा रद्द होणार नाही, असे उमराणी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT